कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
हे तर माणसांचेच पूर्वज आहेत ना..? यांना नाही का कोरोना होणार.. माकडे गावात येताच विनायक या युवकांनी माकडांना शेंगदाणे आणि पाणी दिले प्राणी मात्रावर दया करा यांनाही जीवन जगतांना कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे .मानसे अदृष्य झाली,रस्ते निर्मनुष्य दिसत आहे सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे .मंदिर बंद झाली यात्रा उत्सव नाही .यात्रांन मध्ये येणारे भावीक माकडांनसाठी काहीतरी घेऊन येत असत परंतु कोरोना संसर्गा मुळे गेल्या पाच महिन्यापासून सगळीकडे प्रसिद्ध मंदिर छोट्या-मोठ्या गावातील यात्रा उत्सव बंद आहेत यामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या माकडे गावात येऊन रस्त्यावर फिरताना दिसू लागले आहेत .प्राणीमात्रावर दया करा त्यांच्यावर प्रेम करा लहानपणी शाळेत शिकवलेल्या आठवणींना उजाळा देत जुन्या आठवणी घेऊन येथील विनायक हे नेहमीच पाळीव प्राण्यांसह वन्य प्राण्यावर जिवापाड प्रेम करतात नेहमी प्राण्यांसाठी काहीतरी खाण्यास देणे पाणी पाजणे हा छंद असून ते सध्या कोरोना काळात नेहमीच माकडांना खाण्यापिण्यासाठी देत असतात . कुंभार पिंपळगाव मुख्य बाजारपेठेत वानरांची टोळी आली असता त्यांनी त्यांना खाण्यासाठी शेंगदाने पाणी दिले त्यांना खाऊ घालतांना कोरोना संसर्गाची भीती वाटत नसून ते म्हणाले हे तर माणसाचेच पूर्वज आहेत ना..्. यांना नाही का कोरोना होणार...यांना कोण करणार क्वारंटाईन ...?
Leave a comment