जालना । वार्ताहर
जालना तालुक्यातील गोकुळनगर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत कापुस आणि मुग या पीकाची शेतकर्यांनी सापळा पद्धतीने कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार लागवड केली असून सोमवार ता. तेरा रोजी गोकुळनगर येथील शेतकरी सौ. कुशीवर्ता कडूबा इंदलकर यांच्या शेतामध्ये नंदकिशोर पुंड आणि शेतीशाळा प्रशिक्षक रघुनाथ गोरे यांनी शेतीशाळा घेतली.
यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना पुंड म्हणाले की, कापुस पीकांमध्ये अंतर पीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, सापळा पीके यांचे फायदे शेतकर्यांना सांगीतले तसेच निंबोळ्या गोळा करून त्यामधील निंबोळी अर्क तयार करून तो कपासी या पीकावर फवारणी करावी असेही त्यांनी यावेळी सांगीतले. याप्रसंगी शेतीशाळा प्रशिक्षक रघुनाथ गोरे यांनी करोना बाबत माहिती देत शेतकर्यांनी कापूस पीकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती दिली. या शेतीशाळेसाठी गोकुळनगर येथील शेतकरी भिकाजी इंदलकर, कडुबा इंदलकर, केरुबा शिंदे, डिंगाबर शेळके आदींसह शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Leave a comment