मंठा । वार्ताहर
कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या काळात गोरगरीब , निराधार , दिव्यांग कुटुंबातील नागरिकांना अजिंक्य भाऊसाहेब गोरे यांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने मित्र मंडळाच्यावतिने अनावश्यक खर्च टाळुन जिवानावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले.अभिष्टचिंतन निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.सामाजिक बांधिलकीतून वेळोवेळी निराधार व गरजूंना मदत करण्याचा मानस अजिंक्य गोरे यांनी बोलुन दाखवला. गावातील गोरगरीब ,गरजू , निराधार व दिव्यांग अशा 90 कुटुंबाला गहु , तांदुळ, दाळ, मिठ , मसाला , साखर , चहापत्ती अशा जिवनावश्यक वस्तुची किट वाटप करण्यात आली. आपल्या हातून सामाजिक उपक्रम घडत असल्याचे समाधान व्यक्त करून यापुढेही सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी मित्रमंडाळातील सहकारी उपस्थित होते.
Leave a comment