परतूर येथे पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन तर मंठा भाजपाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन

परतुर । वार्ताहर

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारची बियाणे महामंडळ व इतर अनेक खाजगी कंपन्यांवर शेतकर्‍यांनी गुन्हे दाखल केले असून अद्याप पर्यंत त्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही बोगस बियाण्यांची विक्री करून या सर्व आरोपींनी शेतकर्‍यांची आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक केली असून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे शेतकर्‍यांनी योग्य वेळी पेरणी केली असताना बोगस बियाण्यांमुळे बियाणे उगवले नाही परिणामी उत्पादनात घट झाली व शेतकर्‍यांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करण्याचा संकट उभे राहिले आहे त्यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे महामंडळ व खाजगी कंपन्यांविरोधात जालना मंठा परतूर सेवली आष्टी इत्यादी ठिकाणी अनेक गुन्हे दाखल केले आहेत असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देण्यासाठी भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेशराव भापकर जिल्हा परिषद सदस्य हरिराम माने युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संपत टकले अशोकराव बरकुले माजी सभापती शहाजी राक्षे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले संजय गांधी निराधार समितीचे पद्माकर कवडे नगरसेवक प्रवीण सातोनकर शिवाजी भेंडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुन्हे दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये महाराष्ट्र सरकारचे बियाणे महामंडळ मधील जबाबदार अधिकार्‍यांवर आष्टी तालुका परतुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विभागीय अधिकारी जिल्हा व्यवस्थापक इत्यादींचा समावेश आहे त्याचप्रमाणे सोयाबीन बियाणे विक्री करणार्‍या खाजगी कंपन्यांमध्ये परतूर येथे यशोदा सीड्स स्पर्धा आणि इगल कंपनी इंदूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंठा पोलीस ठाण्यात रेणुका सीड्स कंपनी औरंगाबाद व ईगल सीड्स कंपनी इंदोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना येथे अंकुर सीड्स कंपनी नागपूर तर जालना तालुक्यातील शेवली पोलीस ठाण्यात दिव्य क्रांती जालना व हरितक्रांतीचे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बियाणे महामंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आष्टी पोलीस ठाण्यात अंतर्गतच ग्रीन गोल्ड सीड्स औरंगाबाद या सोयाबीन बियाणे कंपनीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आणि शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या बियाणे महामंडळासह खासगी कंपन्यांमधील अधिकार्‍यांना व संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व शेतकर्‍यांना न्याय द्यावा विनंती भाजपा पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.