सदर बाजार पोलीस व वाहतूक शाखेची संयूक्त कारवाई
जालना । वार्ताहर
जालना दि.11
सध्या कोरोणा विषाणुचा फैलाव हा मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जगभर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरात मागील काही दिवसात कोरोणा कोवीड -19 या विषाणुचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे साहेब यांनी दि.05. 07.2020 रोजीच्या मध्यरात्री पासून ते दिनांक 15.07.2020 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी जाहीर करुन सर्व आस्थापणा बंद ठेवणे बाबत चे आदेश जारी केलेले आहेत.
जिल्हादंडाधिकारी साहेब यांनी संचारबंदी व सर्व आस्थापणा बंद ठेवणे बाबतचे आदेश दिलेले असताना सुध्दा काही किराणा विक्रेते, फळे, भाजीपाला विक्रेते, तसेच अंडी, शेवचिवडा व चहा विक्रेते हे आदेशाची पायमल्ली करुन स्वत:चे आर्थीक फायदया साठी दुकाने उघडुन ग्राहकाची गर्दी जमवुन संचार बंदीचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्यावरुन संजय देशमुख, पोलीस निरीक्षक,पोलोस ठाणे सदर बाजार जालना यांनी स्वत: स्टॉफचे अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन भल्या पहाटे शहरात गल्ली बोळात पेट्रोलींग करुन पेट्रोलींग दरम्यान पोलीस ठाणे हददीत विविध ठिकाणी किराणा दुकान उघडुन विक्री करणारे व्यापारी नामे 1) नुरखान पिरखा पठाण रा.नॅशनल नगर जालना 2) नजिर अब्बास तुडीवाले रा. मजरेवाडी ता.जि.जालना, 3) रफिक ईमाम तुडीवाल रा. मजरेवाडी ता.जि.जालना, 4) अनिल चत्रभुज अग्रवाल रा. चरवाई पुरा जालना, 5) प्रतिक नेमीचंद मुथा यांचे विरुध्द तसेच अंडे विक्री करणारे व्यापारी 6) शेख काशीद शेख मोईन रा. नॅशनल नगर जालना, 7) शेख शोयब शेख मोईन रा. नॅशनल नगर जालना, 8) शेख अमेर शेख दाऊत रा. मंगळबाजार जालना, 9) मो.अल्ताप मो. युसुफ राहणार उडपी चौक, जालना. लोहार मोहल्ला येथे चहाची टपरी उघडून चहा विक्री करणारा चहा विक्रेता 10)सय्यद गफार सय्यद नुरा रा. लोहार मोहल्ला जालना. महिंद्रा जीतो छोटा मालवाहतूक टेम्पोमध्ये भरून गल्लीमध्ये गाडी लावून विक्री करणारा इसम नामे 11) सुमित नंदकिशोर अग्रवाल रा. मोदीकॉम्प्लेक्स समोर बडी सडक जालना. तसेच जालना शहरात कृषी सेवा केंद्र बंद ठेवणे बाबतचे आदेश असताना सुद्धा स्वतःचे कृषी सेवा केंद्र उघडून औषधाची विक्री करणारा 12) जुगल किशोर चुन्नीलाल बाहेती रा. महेश नगर जालना असे व्यापारी यांच्याविरुद्ध तसेच दुचाकी व चारचाकी वर विनाकारण फिरून संचार बंदीचे उल्लंघन करणारे 19 वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई साठी वाहतूक शाखेच्या वतीने सहा.पो.निरि.श्री सुरेश भाले यांच्यासह कर्मचार्यांनी कारवाई केली. सदरची कार्यवाही माननीय श्री एस. चैतन्य पोलीस अधीक्षक जालना, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर, यांच्, मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे, पोलीस उपनिरीक्षक श्री रमेश रुपेकर, शहर वाहतूक शाखेचे सहा.पो.निरि. श्री सुरेश भाले,गणेश झलवार, योगेश चव्हाण यांच्यासह कर्मचारी गणेश साळुंके, समाधान तेलंग्रे, कडुबा सोनवणे, विनोद उरफाटे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, स्वप्नील साठेवाढ, बाबा गायकवाड, योगेश पठाडे, रवी देशमुख, वसंत धस, सोपान क्षिरसागर यांनी पार पाडली.
Leave a comment