मंठा । वार्ताहर
येथील रेणुका कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच वृक्षारोपण आणि बीजारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वेळू, करंजी, निंब, जांभूळ यासारखे वृक्ष तर बोर, पळस, कवट, सीताफळ यासारख्या वृक्षाच्या बिया लावण्यात आल्या.
या उपक्रमासाठी प्रा. राजेंद्र दाभाडे यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक मुसळे, प्रा. सतीश वैद्य, प्रा. आर. सी. राठोड, प्रा. सी. एस. पठाण, प्रा. शाम पवार, प्रा. लहू राठोड, प्रा. मुरली राठोड, प्रा. एस. आर. जाधव, प्रा. डी. डी रंगारी, प्रा. गजानन कांगणे, प्रा. अनिरुद्ध मुजमुले, आसाराम राठोड आदींची उपस्थिती होती.
Leave a comment