मंठा । वार्ताहर
मानवतेला काळिमा फासणार्या वैष्णवी गोरे हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आमदार राजेश राठोड यांनी म्हटले आहे. हत्याकांड घडल्यानंतर तातडीने आमदार राठोड यांनी गोरे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
तसेच याप्रकरणी आपण लक्ष घालून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. कुटुंबीयांची भेट घेताना त्यांनी तीन महिन्याचा किराणामाल मदत म्हणून देऊ केला. याप्रकरणी त्यांनी पोलिस निरीक्षक विलास निकम यांचीही भेट घेऊन चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरे कुटुंबीयांना मदत देण्याचे आश्वासन दिले.सदर प्रकरणी कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी हा खटला निष्णात वकिलामार्फत जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी त्यांनी गृहमंत्र्यांशी पत्र व्यवहार केला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष सिराज खान पठाण, प्रकाश घुले, अशोक खरात, सुरेश वाव्हळे, मोईन कुरेशी, हरिभाऊ ताठे आदी होते.
Leave a comment