आनेकांनी पसरवली होती अफवा

कुंभारपिंपळगांव । वार्ताहर

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील गजानन हॉस्पिटल ता. 11 जुलै शनिवार पासून पूर्ववत  झाले सुरू काहींनी. पसरवली होती अफवा..... सामाजिक बांधिलकी जपणारे वीस ते पंचवीस वर्षापासून अविरत सातत्याने आरोग्यसेवा देणारे चांगला अचूक मार्गदर्शन करणारे योग्य सल्ला देणारे पैशावर नाहीतर माणसावर प्रेम करणारे समाजाचे भान असणारे डॉक्टर जे.बी. राजूरकर यांचा कुंभार पिंपळगाव येथील कोरोना संसर्ग पॉझिटिव झालेल्या  रुग्णाच्या क्वचित संपर्क येताच त्यांनी स्वतःहून कुटुंब व हॉस्पिटलला येणार्‍या रुग्ण पासून होम क्वारंटाईन राहून दोन दिवसानंतर स्वतःहून आरोग्य विभाग घनसावंगी विलगीकरण कक्षात स्वतःहून हजर होऊन कोरोना संसर्गाची तपासणी करून घेतली . 

घनसावंगी येथे स्वतःहाऊन क्वारटाईन राहिले व त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पंधरा दिवसानंतर आपले हॉस्पिटल पूर्ववत सुरू केले गेल्या पाच-सात 5-6 महिन्यापासून कोराना  संसर्ग जसा जसा वाढत गेला त्याकाळात न घाबरता माणुसकीची नाळ जपत कोरोना संसर्गाची जनजागृती केली स्वतः हा न डगमगता.न घाबरता रूग्णांनाची काळजी घेत कोरोना संसर्गावर उपाय सुचऊन योग्य मोलाचा सल्ला देत ..आपली आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हीच जनसेवा समजून आरोग्य सेवेस प्राधान्य देत जनसामान्यांना आरोग्याच्या सुविधा देत जीवाची पर्वा न करता कोरोना संसर्ग बाबत योग्य मार्गदर्शन देत ..गेल्या 150 दीडशे दिवस एक दिवस बंद न ठेवता आरोग्य सेवा सुरूच ठेवली होती त्यांनी यापूर्वीही अनेक साथीच्या आजारात परिसरातील 40 ते 43 खेड्या गावातील गोरगरीब - सर्वसामान्य जनतेस  सर्वांनाच साथीच्या रोगात आधार देत अचुक उपचार केले मग तो चिकनगुनिया असो गॅस्ट्रो असो की तापीची साथ असो की कोरोना महाभयंकर संसर्ग असो त्यांनी आपली सेवा सुरूच ठेवली. समाजाचं देणं लागत सामाजिक बांधिलकी जपणारे येथील गजानन हॉस्पिटलचे डॉ.जनार्दन भागुजीराव  राजूरकर हे अगदी अलर्ट  अचूक सल्ला देणारे डॉक्टर व माझ्यामुळे माझ्या हॉस्पिटलला येणार्‍या रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली येणारे सर्व रूग्ण माझे दैवत आहेत आणि त्यांची सेवा करणे हेच मी माझे कर्तव्य समजतो या आरोग्य सेवेतच मला समाधान मिळते आणि त्यांचा सर्वांच्या आशीर्वादाने मी आज येथे त्यांना आरोग्यसेवा देऊ शकत आहे असे त्यानी म्हणटले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.