बदनापूर । वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा बंदी करण्यात आलेली असून त्याची अंमजबजावणीसाठी जालना- औरंगाबाद महामार्गावर वरूडी येथे चेक पोस्ट बनवण्यात आलेला आहे. या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करूनच वाहने सोडण्यात येतात. त्यामुळे या पोलिसांनाही कोरोनाची भिती असल्यामुळे येथील काही तरुणांनी पोलिसांना फेस शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
बदनापूर तालुकयातील वरूडी येथे जालना जिल्हया प्रवेश करणार्या वाहनांची तपासणी करण्याकरिता जालना पोलिस दलाचे पथक मागील तीन ते चार महिन्यापासून कार्यरत आहे. येणार्या वाहनांना परवाना आहे की नाही याची तपासणी व नोंद करूनच जिल्हयात प्रवेश दिला जातो. ठिकठिकाणांहून येणार्या वाहनांची तपासणी करताना या पोलिस कर्मचार्यांचा थेट संपर्क येणार्या वाहनांशी होत असल्यामुळे त्यांनाही कोरोनाच भिती असते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिसांना बदनापूर येथील कल्याण देवकते, बाबासाहेब बनसोड, अनिल सपकाळ, मनोहर गजर यांच्या वतीने फेस मास्क देऊन त्यांच्या कार्याबददल गौरवित करण्यात आले. सदरील तरुणांनी वरूडी येथे जाऊन चेक पोस्टवरील कर्मचार्यांना या फेस मास्कचे वाटप केले.
Leave a comment