बदनापूर । वार्ताहर
बदनापूर तालुक्यातील दुकानदार युरिया खतासाठी शेतकर्याची करतात पिळवणूक शेतकरी युरिया खत घेण्यासाठी दुकानदाराकडे गेले युरिया खत नाही किंवा युरीया खत पाहिजे तर कोणते तरी दुसरे खत सोबत घ्यावे लागेल म्हणजे 265 रू युरिया सोबत 10, 26, 26 किवा कोणते तरी दाणेदार खत रुपये 1200 किवा 1300रू चे खत घ्यावे 265, 1200. एक युरिया गोणीसाठी 1465रु. युरिया शेतकर्यांच्या हातात पडतोय अधिकारी सांगतात शेतकर्यांना बांधावर खत उपलब्ध करून देऊ .अहो साहेब बांधावर नको पण दुकानात तरी खत उपलब्ध करून द्या तालुक्यांतील अधिकारी यांना हा सगळा प्रकार माहीत आहे पण मूग गिळून गप्पच आहे हे अधीकारी का गप्प आहे हे कोडे मात्र शेतकर्यांना समजेनासे झाले. अधिकारी का गप्प आहे याची चर्चा मात्र शेतकर्या मध्ये रंगताना दिसते.
आज तोच बलीराजाला एका युरियाच्या गोणी साठी या दुकानातुन त्या दुकानात वेड्या सारख्या चकरा माराव्या लागत आहे. खरच ही सगळी साखळी शेतकर्यांना लुबाडणूक करण्यासाठी आहे का असा पश्न निर्माण होतो. तालुक्यातील शेतकर्यांसाठी कुणी वालीच नाही का असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. युरीया सोबत 10 26 26 घ्यावे लागेल म्हणजे या म्हणी प्रमाणे झाले सासरचे लोक ही म्हणायचे बायकोला सोबत घेऊन जा पण सोबत सासरे नाहीतर साल्याला घेऊनच जावे लागेल अशी अस्वथा सध्या बदनापूर तालुक्यातील शेतकर्यांची झाली आहे. महत्वाचे म्हणजे शहरातील एका पण कृषी सेवा दुकानाबाहेर भाव फलक लावलेले नाही शासनाने आदेश दिले होते की सर्व दुकानदारांना खताचे भाचे फलक, किती स्टोक आहे दुकानाच्या दर्शनी भागात लावावा पण एक सुद्धा दुकानात लावलेला नाही याची तक्रांर पंचायत समिती कृषी अधिकारी तांगडे याच्या कडे केली .तरी ही तांगडे मूग गिळून आहेत आता तर काही दुकानदार सांगतात की युरिया पाहजे असेल तर पोटेश पण घेवा लागेल किंवा 400 ते 500 रूपाया पर्यंत टॉनिक बॉटल देतात यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडणीत सापडला आहे. या वषी तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्या मुळे कापाशी पिवळी पडू लागल्याने शेतकर्यांना युरिया खत टाकल्याशिवाय पर्याय नाही हे सर्वच दुकानदार यांना माहीत आहे म्हणून सर्यास दुकानदार शेतकर्याची लूट करीत आहे असे शेतकरी कैलास बापूसाहेब पवार यांनी म्हटले आहे.
Leave a comment