नगरसेवक विष्णू पाचफुले यांच्या मागणीला यश : दहा लाखांची तरतूद!
जालना । वार्ताहर
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे जालना शहरातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीच्या भुर्दंडातून कुटुंबियांची सुटका होणार असून नगरपालिका हा संपूर्ण खर्च उचलणार आहे.शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी केलेल्या मागणी नंतर कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीसाठी नगराध्यक्षांनी या कामी दहा लाखांचा निधीची तातडीने तरतूद केली आहे.
जालना शहरातील कोरोना रूग्ण व मृत्यु चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 10) टाऊन हॉल स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी कोरोना आजारामुळे मृत पावणार्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे.आधीच उपचारासाठी महागड्या खर्चाने सर्वसामान्य कुटुंबांचे हाल होत आहे. त्यातच बाधीत व्यक्ती मृत पावल्यानंतर अंत्यसंस्काराचा खर्च ही मृतांच्या कुटुंबियांना सहन करावा लागतो. असे सांगून विष्णू पाचफुले यांनी सदर खर्च नगरपालिकेने करून मृतांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा.अशी आग्रही मागणी केली. विरोधी पक्षनेते विजय पवार,निखील पगारे,किशोर पांगारकर यांच्या सह सर्व नगरसेवकांनी या मागणीस पाठिंबा दिला. नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी ही बाब गांभीर्याने घेत तात्काळ दहा लाखांची तरतूद केली. या पुढे अंत्यविधी च्या खर्चातून कुटुंबियांची मुक्तता झाली आहे. दरम्यान स्वॅब टेस्ट करण्यासाठी येणार्या कर्मचारी वर्गाकडून दबाव निर्माण केला जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून स्वेच्छेने स्वॅब घ्यावे. अशी मागणी ही नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी केली. या पुढे स्वॅब साठी दबाव दिला जाणार नाही.
Leave a comment