अत्मदहन केल्यानंतर कुंटूबांला घराचा लाभ मिळेल का ?
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील कॅन्सरग्रस्त आजाराने त्रस्त 42 % टक्के अपंग असलेल्या व्यक्तीला गेल्या चार वर्षापासून घरकुलासाठी शासनाच्या दारात 2016 पासून खेट्या माराव्या लागत आहे .त्यास आत्तापर्यंत आशेचे गाजर दाखवण्यात आहे. समाज कल्याण विभागाला याबाबत वळो वेळो पाठ पुरावा केला आहे.
26 -1 - 2019 ला त्या कॅन्सरग्रस्त आजाराने त्रस्त असलेल्या त्या व्याक्तीने विषारी औषध प्राषान करून अथवा आत्मदहन करणार असाही इशारा देण्यात आला होता तसे निवेदन समाज कल्याण विभाग.जि.प.जालना.व प.स.घनसावंगी यांना दिले होते . निवेदनाची समाज कल्याण विभागाने दखल घेऊन त्यांना तोंडी आश्वासन देऊन तसे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास लावले होते.
समाज कल्याण जिल्हा परिषद विभागा कडून 5% दिव्यांगांना निधी घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज 31- 12 -2019 रोजी मागवण्यात आले होते. या अंपग व्याक्तीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग ऑनलाईन अर्ज देण्यात आला होता. ते अर्ज स्वीकारून पात्र उमेदवाराच्या यादीत नांव ही आले असून त्यास आपणास 31 मार्च एंडिंग पर्यंत ला घर मिळेल असे त्या अपंगास पत्र देऊन कळविण्यात आले होते. व त्या वेळी त्यास उपोषण मागे घेण्यास जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकार्यांनी जिल्हा परिषद तसे पत्र देऊन अर्जदारास उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. आज पर्यंत जुलै 10 तारखे अखेर पर्यंत कुठल्याही प्रकारचे घरकुलाची पुर्तता करण्यात आली नाही.
याबाबत या कॉनर्स ग्रस्त व्याक्तीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालक मंत्री, तहसिलदार ,पंचायत समिती यांना ही निवेदन देण्यात आली होती. त्या व्यक्तीने आत्मदहन केल्यावरच घर त्याच्या कुटुंबाला मिळेल का...? असे मत त्या कॅन्सरग्रस्त अपंग व्यक्तीने व्यक्त केलेले आहे आजही त्या कॅन्सरग्रस्त अपंग व्यक्तीला घरकुल मिळाले नसून शासनाच्या खेट्या चार वर्षापासून माराव्या लागत आहेत कोणी घर.... देता.... का...? .... घर म्हण्याची वेळ त्याच्यावर आली आहे या वरून शासन कुठल्या पद्धतीने काम करते असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. त्या व्यक्तीला घरकुलासाठी चार वर्ष सातत्याने प्रयत्न करूनही घरकुल मिळत नसेल तर धडधाकट व्यक्तींना शासनाकडे या बाबत किती खेट्या माराव्या लागत असतील यावरून स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकाराची हकीगत समाज कल्याण मंत्री यांना देण्यात आली आहे.
Leave a comment