मुख्यमंत्र्याच्या हस्ते लवकरच लॅबचा शुभारंभ होणार
जालना । वार्ताहर
जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर लॅबलाराज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दि. 10 जुलै रोजी भेट देत लॅबच्या उभारणीची पाहणी केली.
संपूर्ण मराठवाड्यात अव्वल ठराव्या अशा सुसज्ज व अद्यावत लॅबची उभारणी जालना येथे करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या लॅबचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड, डॉ.हयातनगरकर, डॉ.शेजुळे, डॉ.जगताप, यांची उपस्थिती होती.
Leave a comment