48 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्ह्यात 56 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह
जालना । वार्ताहर
जालना शहरातील अग्रेसन नगर -3, इन्कम टॅक्स कॉलनी -1, काद्राबाद -1, रामनगर -1, लक्ष्मीकांतनगर -1, मोदीखाना -3, सुभद्रानगर -1, आर.पी. रोड -1, पानीवेस -1, जिल्हा सामान्य रुग्णालय -1, श्रीकृष्ण नगर -2, कोठारीनगर -1, तलरेजा नगर-15, एस.टी. कॉलनी -1, गोपाळपुरा -1, चंदनझीरा -1, पेंशनपुरा -3, मुर्तीवेस -2,नया बाजार -1, बरवार गल्ली-1, नहाबी कॉलनी -1. एकलहेरा ता. अंबड -1, गारखेड ता.सिंदखेड राजा -1, टेंभुर्णी -1 रोहिलागड ता. अंबड -1, कैलास मंगल कार्यालय भोकरदन - 1, अशा एकूण 48 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर बरवार गल्ली - 1, काद्राबाद -09, क्रांतीनगर -3, साईनगर-4, मिशन हॉस्पीटल रोड -1, सुवर्णकार नगर - 3, एस. टी. कॉलनी -1 , कांचन नगर -1, आशिर्वाद नगर -1, अंबड चौफुली -1 , सदर बाजार -1, नुतन वसाहत -1, संभाजी नगर -2, ग्रीन पार्क -1, जिल्हा सामान्य रुग्णालय- 1, आनंदस्वामी वार्ड -1 गोपीकिशन नगर -1, रामनगर -1, कालीकुर्ती -1, ख्रिश्चन कॉलनी -1, गणपती गल्ली- 2, गवळी गल्ली -2, प्रयाग नगर -1, ढवळेश्वर -1, खवा मार्केट -1, आयोध्या नगर -1, अमरछाया टॉकजी -1, कन्हैयानगर -1, अमित हॉटेल -1, दहीपुरी ता. अंबड -3, नुतन कॉलनी भोकरदन -1, सुतारगल्ली टेंभुर्णी -4, शिंगोणा ता. परतुर -1 अशा एकूण 56 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 5091, असुन सध्या रुग्णालयात-265 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1970, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-214 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6805 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-56 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-908 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -5600,रिजेक्टेड नमुने-16, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-420 एकुण प्रलंबित नमुने-281,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1668. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-6, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-1456, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -94, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-588, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-35, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-265,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-73, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-48, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-563, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-279 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-29, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-16219, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 37 एवढी आहे.
जालना शहरातील पेंशनपुरा परिसरातील 60 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, न्युमोनिया,मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि.7 जुलै 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि.10 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.8 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनिया, उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे दि.27 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 9 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट दि.26 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 588 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-03, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना- 22, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 54, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-07, जे ई एस मुलांचे वसतिगृह- 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह - 03, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 65, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 98, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 91, केजीबीव्ही परतुर- 09, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड -09, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-25,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-13, ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -20,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-06, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 12, शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन-38,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -34,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -18,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-04 लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -929 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 852 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 47 हजार 430 असा एकुण 6 लाख 73 हजार 838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जालनेकरांची प्रभाग निहाय होणार स्वॅब तपासणी
शहरात 36 स्पॉट वर मोबाईल रूग्णवाहिकेद्वारे संवेदनशील व्यक्तींसाठी टेस्टींग (तपासणी) सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी आज टाऊन हॉल येथील सभागृहात मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, आरोग्य अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक प्रभागात 20 व्यक्तींचे हायरिस्क असलेल्यांचेच स्वॅब टेस्टींग केली जाणार आहे. अशा व्यक्तींची यादी नगरसेवक यांना दिली जाईल. गर्दी टाळून केवळ संबंधित व्यक्तीचेच स्वॅब घेतले जातील अँटीजेन टेस्टींग, स्वॅब टेस्टींग सोबतच अँटीजेन टेस्टींग नवीन प्रणाली उपलब्ध झाली आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तींना या द्वारे टेस्टींग केली जाण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
Leave a comment