उच्च न्यायालयाचे माजी मंत्री लोणीकर यांनी मानले आभार
जालना । वार्ताहर
बियाणे महामंडळ मधील अधिकारी आणि कंपन्या यांच्यामध्ये यानिमित्ताने अर्थपूर्ण व्यवहार झाले असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकर्यांना ङ्गसवण्यासाठी कंपन्यांकडून काहीतरी गौडबंगाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही आमचं बियाणं चांगलं होतं शेतकर्यांची चूक आहे असा युक्तिवाद न्यायालयात बियाणे कंपन्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बियाणे महामंडळ किंवा कंपनीचे गोदाम मधील बियाणे डीलर किंवा सब डीलर कडे देण्यात आलेले बियाणे पूर्णतः सील करण्यात यावेत या बियाण्यांमधून उगवणशक्तीची तपासणी करण्याची गरज भासल्यास बियाणे घेण्यात यावे बियाणे महामंडळ किंवा कंपनीच्या गळाला लागलेला ङ्गास काढण्यासाठी कंपन्या न्यायालयात खोटी माहिती देण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांच्या शासकीय समितीमार्ङ्गत गोडाऊन मधील डीलर किंवा सब डीलर यांच्याकडील असणार्या बियाण्यांची त्रयस्थ प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात यावी सर्व व गोडाऊन सील करण्यात यावेत व तो तपासणी अहवाल माननीय न्यायालयात सादर करण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांनी अत्यंत विश्वासाने महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाकडून इंदूर येथील इगल कंपनीकडून किंवा आणखी इतर कंपन्यांकडून दर्जेदार म्हणणारे बियाणे खरेदी केले होते परंतु खाजगी कंपन्यांबरोबरच महाराष्ट्र सरकारचा बियाणे महामंडळाकडून देखील शेतकर्यांची ङ्गसवणूकच झाली आहे प्रत्येक कंपनीकडे किंवा बियाणे महामंडळाकडे उगवणक्षमता तपासणी करण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आहे परंतु ठराविक लॉटची तपासणी कंपन्या किंवा महामंडळाकडून करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे उगवण क्षमता नसलेले दर्जाहीन बियाणे शेतकर्यांच्या माथी मारण्यात आले त्यामुळे शेतकर्यांना काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करण्याचं महासंकट शेतकर्यांसमोर उभा राहिलं आपल्या सन्माननीय कृषिमंत्र्यांनी ज्या शेतकर्यांचे बियाणं उगवलं नाही त्या शेतकर्यांना तात्काळ मोङ्गत बियाणे देण्यात येईल अशी घोषणा केली परंतु प्रत्यक्षात मात्र अधिकार्यांनी कृषिमंत्र्यांच्या या घोषणेला केराची टोपली दाखवल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे असेही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी बियाणे विक्रेते असणार्या छोट्या-छोट्या व्यापार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत प्रत्यक्षात त्या व्यापार्यांचा यामध्ये काहीही दोष नाही त्यांनी केवळ कंपन्यांकडून बियाणे खरेदी केले व शेतकर्यांना विक्री केली त्याची पावती दिली त्यामुळे तो संबंधित दुकानदार देखील गुन्हेगाराच्या पिंजर्यात अडकला आहे त्यांच्यासाठी अधिनियमात बदल करून अशा छोट्या-छोट्या दुकानदारांना साक्षीदार बनवण्यात यावं अशी विनंती माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. हा महाराष्ट्र शेतकर्यांचा महाराष्ट्र आहे परंतु प्रत्यक्षात अधिकारी या शेतकर्यांना सन्मानाची वागणूक देताना दिसत नाही पाथरी जिल्हा परभणी येथील पोलीस निरीक्षकाने पाथरी तालुक्यातील शेतकरी विष्णू शिंदे (मंडसगाव) यांची आत्महत्या झाल्यानंतर देखील शेतकर्यांनी बोगस बियाण्यांची गुन्हे दाखल करण्याबाबत विनंती केली असता त्या शेतकर्यांना बेजबाबदारपणे बेजत करण्यात आलेत ही बाब अत्यंत गंभीर आहे पाथरी प्रमाणात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देखील महादेव बिक्कड (बहुला) या शेतकर्याने आत्महत्या केली असून बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उगवले नाही म्हणून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील पोलीस निरीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्याचे पोलीस निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे केली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमच्या व सर्व सामान्य शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेत संबंधित दोषींवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत त्याबद्दल मा न्यायालयाचे आभार मानत सरकारने देखील कृषी व गृह विभागामार्ङ्गत योग्य ती कार्यवाही करावी व लवकरात लवकर निवृत्त न्यायाधीश यामार्ङ्गत एक समिती स्थापन करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा असेही माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
Leave a comment