स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
जालना । वार्ताहर
औरंगाबादकडून जालना शहराकडे एका कारमध्ये 62 लाख रुपये घेऊन जाणार्या चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी नागेवाडी टोलनाक्यावर आज दि 9 रोजी भल्या पहाटे पकडले आहे, या बाबत थोडक्यात माहिती अशी की मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी नागेवाडी टोल नाक्याजवळ सापळा लावून औरंगाबादकडून येणारी कार क्र. एमएच-21, बीएङ्ग-5157 ची झडती घेतली असता गाडीमध्ये रोख 60 लाख 24 हजार 500 रुपये आढळून आले.
या रक्कमेबाबत चौकशी केली असता, कारमधील दोन व्यक्तींनी कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही. यावेळी कारमधील संतोष आम्ले, सुरेश देशमुख (दोघेही रा. जालना) या दोघांना ताब्यात घेतले आहे. रोख 62 लाख 24 हजार 500 आणि 12 लाख रुपये किंमतीची कार असा एकूण 72 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment