जालना । वार्ताहर

जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशचंद्र तवरावाला यांचा औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज बुधवारी सायंकाळी दुर्देवी मृत्यू झाला. मृत्यू समई ते 68 वर्षाचे होते असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी श्री तवरावाला हे कोरोना बाधीत झाले होते. प्रथम त्यांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील धुत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. ते स्वतः पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आल्यामुळे कुटुंबातील इतर लोक देखील कोरोना बाधीत आढळून आल्याने रमेशचंद्र तवरावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर याच रुग्णालयात उपचार सुरू होते.

दोन ते तीन दिवसांपूर्वी तवरावाला यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र रमेशचंद्र तवरावाला यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही आणि आज बुधवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. जालना जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक,क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात रमेशचंद्र तवरावाला यांनी भरीव कार्य केले आहे.जालना शहरातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या जेपीसी बँकेचे चेअरमन पद त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळले असून जालना जिल्हा कबब्डी असोसिएशनचे अध्यक्षपदावर देखील ते गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.जालना शहर व जिल्ह्यातील व्यापार्‍यांच्या हितासाठी  नेहमीच संघर्षाची भूमिका घेऊन व्यापार्‍यांना पाठबळ देण्याचे काम श्री तवरावाला यांनी केलेले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच जालना शहर व जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.