जालना । वार्ताहर
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील प्रगतशील शेतकरी विष्णू वाघ यांच्या शेतात कापूस आणि मुग या पीकावर शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी शेतीशाळा वर्गासाठी सरपंच नंदकिशोर वाघ, कृषी पर्यवेक्षक पी. ए. शिंदे, शेतीशाळा प्रशिक्षक रघुनाथ गोरे, समुह सहायक सतीष मुसळे यांच्यासह परिसरातील शेतकर्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी घेण्यात आलेल्या शेतीशाळेला मार्गदर्शन करतांनी समन्वयक नंदकीशोर पुंड यांनी शेतकर्यांना वनस्पतीजन्य व प्राणीजन्य किटकनाशके घरच्या घरी तयार करून शेतीतील खर्च कमी करण्याचे आवाहन केले. तसेच शेतीशाळा प्रशिक्षक रघुनाथ गोरे यांनी कापुस आणि मुग या पीकांमध्ये आंतरपीक, सापळा पीक कसे घ्यावे या विषयावर सविस्तर माहिती दिली. कृषी संजीवनी सप्ताह निमीत्ताने कृषी पर्यवेक्षक पी. ए. शिंदे यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती दिली. तसेच समुह सहायक सतीष मुसळे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली.
Leave a comment