दहा वाहनांना त्यांचा आर्थिक मोबादला मिळाला नाही
बदनापूर । वार्ताहर
विधानसभा निवडणूक कालावधीत बदनापूर तहसिल मार्ङ्गत लावलेली खाजगी वाहनांना अद्याप पर्यंत मोबादला मिळालेल्या नाही . सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी बदनापूर तहसिल कार्यालयाकडून खाजगी वाहने ताब्यात घेतली होती . विधानसभा निवडणूक होवून नऊ महीन्याचा कालावधी उलटून गेला मात्र अद्याप पर्यत सदरील दहा वाहनांना त्यांचा आर्थिक मोबादला मिळालेला नाही.
सध्या कोविड 19 प्रादृर्भाव असल्याने सदरील वाहनधारकांचे जिवनमान हालाकीचे झाले असून आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत असल्यामुळे सदरील वाहनाचा मोबादला लवकरात लवकर मिळावा यासाठी वाहनधारकांनी मा. तहसिलदार यांना निवेदनाद्वारे कळविले आहे . सदरील निवेदन रवि लक्ष्मण गायकवाड , रमेश शामराव जर्हाड , उध्दव त्रिंबक खैरे , पदमाकर पडूळ , नारायण बोचरे , ज्ञानेश्वर पवार , सदाशिव शिंदे , गोरख निबांळकर , शेख नईम शेख महेबुब , रवि साईनाथ वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या वाहनांचा मोबादला मा.जिल्हाअधिकारी साहेबांनी लवकरात लवकर अदा करावा नसता आम्हाला उपासमारीमुळे नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागेल .असे निवेदनात म्हटले आहे .
Leave a comment