जालना । वार्ताहर
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिनांक 11 जुलै ते 18 जुलै 2020 पर्यंत 10 व्या राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषदेचे (पहिली ऑनलाईन) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल,महासचिव सुनील चव्हाण यांनी आज दिली. दिनांक 11 जुलै ते 18 जुलै 2020 पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते 7.30 चालणार्या सदरील आँनलाईन 10 व्या राष्ट्रव्यापी शैक्षणिक परिषदेत राज्य व देशातील विविध नामवंत वक्ते वेगवेगळया शैक्षणिक विषयांवर आपले विचार ङ्गेसबुक लाईव च्या माध्यमातून संघटनेच्या डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिषक परिषद,महाराष्ट्र ह्या अधिकृत ङ्गेसबुक पेज वर मांडणार आहेत.
दि. 11 जुलै 2020 सायंकाळी 4.30 ते 5 संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर हे भूमिका मांडतील,याच दिवशी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत डॉ. प्रशांत गावंडे (यवतमाळ) हे मुलांचे मानसशास्त्रीय व शैक्षणिक संगोपन या विषयावर तर 6 ते 7 या वेळेत प्रा.प्रल्हाद डवरे (अमरावती) प्रश्न निर्मितीचे कौशल्य या विषयावर विचार मांडतील. दि. 12 जुलै सायंकाळी 5 ते 6 वेळेत अँड गणेश हलकारे (अमरावती) हे मानवाची उत्क्रांती व धर्माचा उगम व 6 ते 7 वेळेत व डॉ.सतीष पावडे (वर्धा) हे डॉ.पंजाबराव देशमुख यांची कला संस्कृती विषयक भूमिका... या विषयावर विचार मांडतील, दि. 13 जुलै रोजी 5 ते 6 वेळेत प्रवीण देशमुख (कळंब) हे उदोन्मुख भारतातील समाज आणि शिक्षण तर 6 ते 7 वेळे किशोर दरक (पुणे) हे- कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण दुसर्या साथीची नांदी या विषयावर विचार मांडतील दि. 14 रोजी सायंकाळी 5 ते 6 श्रीमती प्रतिभाताई भराडे (सातारा) ह्या-मुल कसं शिकत ? आणि 6 ते 7 या वेळेत विठ्ठल भुसारी (परभणी) हे शिक्षणाचा अर्थ आणि अन्वयार्थ या विषयावर विचार मांडतील, दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत लिलाधर पाटील (अमळनेर) हे - नवीन शिक्षण नीती आणि शिक्षणाचा प्रश्न.. व 6 ते 7 या वेळेत वैशालीताई डोळस(औरंगाबाद) ह्या सावित्रीबाई ङ्गुले आणि मुलींचे शिक्षण या विषयावर विचार मांडतील. दि.16 जुलै ला सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अलकाताई लुंगे (अमरावती) शिक्षक : सृजन पंढरीचे वारकरी या विषयावर तर 6 ते 7 या वेळेत मा.आ.दत्तात्रय सावंत (पुणे) हे शिक्षकांच्या समस्या व उपाय या विषयावर विचार मांडतील, दि. 17 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 7 अमृत साळुंके (सातारा) हे इतिहास संशोधनातील साधने व इतिहास लेखनातील त्यांची विश्वासाहता या विषयावर विचार मांडतीलसदरील शैक्षणिक परिषदेचा अध्यक्षीय समारोप दिनाक 18 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा.वसंतराव पुरके सर हे करणार आहेत.
तरी राज्यातील सर्व शिक्षक ,पालक व विद्यार्थी ह्या वैचारिक पर्वणीचा कोरोनाच्या ह्या संकट काळात घरी राहून आनलाईन पद्धतीने ङ्गेसबुक लाईव च्या माध्यमातून लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते,सतिष काळे,प्रा.शेषराव येलेकर,अंबादास रेडे,डाँ.विलास पाटील,राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे,शामराव लवांडे,अजित पाटील,वसंत नेरकर,राजेंद्र भोयर,शालिक बोरसे,बंडू डाखरे,प्रल्हाद कर्हाळे,देवेंद्र टाले,ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव,आर.आर.वांडेकर,के.डी.वा
Leave a comment