भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांचे प्रतिपादन
मंठा । वार्ताहर
मंठा येथे झालेले वैष्णवी गोरे हत्याकांड अत्यंत निर्दयी व निर्गुण अशा स्वरूपाचे असून या हत्याकांडातील आरोपी शेख अश्पाक शेख बाबू याला फाशीची शिक्षा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा भाजपा महिला आघाडीच्या वतीने केला जाणार असून प्रसिद्ध विधिज्ञ उज्वल निकम यांनी हा खटला लढण्याची तयारी दर्शवली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिकृत मंजुरी दिलेली नाही ती मिळावी यासाठी देखील भाजपा महिला आघाडी प्रयत्नशील राहील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून महिला आघाडी सातत्याने या या प्रकरणाचा पाठपुरावा करून वैष्णवीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी केले. मंठा येथे दिवंगत वैष्णवी गोरे यांच्या कुटुंबीयांची भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे यांनी आज भेट घेतली, यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सविताताई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, शैला मोळक, नगरसेवक श्री मोळक तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे जि प सदस्य पंजाबराव बोराडे संचालक मुस्तफा पठाण अशोकराव वायाळ भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अन्साबाई राठोड तालुका उपाध्यक्ष जयश्री पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे म्हणाल्या की सदरील नराधम गुन्हेगार याला कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखवता फास्टट्रॅक कोर्टामार्फत लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी त्यासाठी भाजपा महिला आघाडी म्हणून आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करणार असून प्रसारमाध्यमांनी देखील त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत यावेळी खापरे यांनी मंठा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक विलास निकम यांची देखील भेट घेतली व त्या नराधमाला कोणत्याही प्रकारची कारण सभा मिळू नये यासाठी काटेकोर अहवाल पाठव लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी पारदर्शी काम करावे अशी विनंती केली. गोरे कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या मदतीसाठी व दिवंगत वैष्णवी गोरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही यावेळी उमाताई खापरे यांनी उपस्थितांना दिली पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून एक नवा आदर्श निर्माण केला असून पोलिसांचे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून अभिनंदनीय आहे त्या नराधमाला फासावर लटकण्यासाठी देखील सर्व स्तरातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन लढा द्यावा व दिवंगत वैष्णवी गोरे हिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील यावेळी प्रदेशाध्यक्षा खापरे यांनी केले.
Leave a comment