तिर्थपुरी । वार्ताहर
जालना जिल्ह्यात कोरोना व्हायरस कोविड-19 या संसर्गजन्य आजाराचा वेगाने फैलाव होत असल्याने, तसेच आपल्या परिसरातील एकलहेरा, तसेच घनसावंगी, कूंभारपिंपळगाव येथे कोरोनाग्रस्त नागरीक आढळुन आले असल्यामूळे, तीर्थपुरी येथील गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, व गावकर्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि.8 बुधवार ते दि.12 रविवार पर्यंत वैद्यकीय सेवा वगळून तीर्थपुरी येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचे सर्वानूमते ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला असून बंदकाळात फक्त कृषी सेवा केंद्र हे सकाळी 07:00 ते दूपारी 12:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
तसेच नागरीकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजीक अंतर ठेवावे, मास्क व हातरुमाल यांचा नियमीत वापर करावा.जो नागरीक तोंडाला मास्क अथवा हातरुमाल न लावता फिरत असल्याचे निर्दर्शनास आल्यास, ग्रामपंचायतच्या वतीने प्राथमिक कार्यवाही म्हणुन 100 दंड आकारण्यात येईल याची गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी.कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलनासाठी प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती. ग्रामपंचायत कार्यालय तीर्थपूरी व्यापारी महासंघ तीर्थपूरी पोलीस प्रशासन तीर्थपुरी सर्वपक्षीय पदाधिकारी, सा.कार्यकर्ते तीर्थपुरी समस्त गावकरी तीर्थपूरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a comment