मंठा । वार्ताहर
तालुक्यातील शेतकर्यांनी नगदी पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली.परंतु बियाणे उगवले नसल्याने शेतकर्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.आठ ते नऊ सोयाबीन कंपनीचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी 386 शेतकर्यांनी कृषी कार्यालयाकडे केल्यानंतर पंचनामे व पाहणी करण्यात आली.आता महाबीजकडून बियाणे घेतलेल्या शेतकर्यांना बियाणे बदलून मिळणार असल्याचे कृषी अधिकारी व्ही.जे.राठोड यांनी सांगितले.
तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी प्रामुख्याने महाबीजसह इतर नवख्या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे.परंतु सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकर्यांना धक्का बसला. शेतकर्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्यांकडे केली. त्यानंतर शेतकर्यांच्या तक्रारीची दखल घेऊन 5 सदस्यीय पथकाने शिवाराला भेट देऊन काही शेतकर्यांच्या पेरणीची पाहणी व पंचनामे सुरू केलेले आहे.कृषी कार्यालयातुन सांगण्यात आले की, महाबीज महामंडळाच्यावतिने बियाणे न उगवलेले शेतकर्यांचे नुकसान होत असल्याने शेतकर्यांना बियाणे बदलुन देणार असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.परंतु तालुक्यात महाबीजसह इतर 9 कंपन्याचे सोयाबीन बियाणे उगवलेले नाही. त्यात केवल महाबीजकडुनच बियाणे परतावा येत आहे.त्यामुळे इतर कंपन्यांनी शेतकर्यांना सोयाबीन बियाणे बदलून द्यावे.अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असुन वेळेत पेरणी झाल्यास उतारही चांगला येतो असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. कधी नव्हे ते यावर्षी पेरणीनंतर पाऊस बरसला आणी शेतकर्यांनी उसनवारीसह सोने-नाणे गहाण ठेवून सोयाबीन बियाणे खरेदी केले व काळ्या आईची ओटी भरली.परंतु सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने बियाण्यासह पेरणी खर्चही वाया गेला.आता केवळ महाबीजकडून बियाणे बदलून मिळणार आहे.मग इतर कंपन्याकडून खरेदी केलेल्या बियाणे बदलुन मिळणार की नाही हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे
Leave a comment