तिर्थपुरी । वार्ताहर
मंठा येथील नवविवाहिता वैष्णवी गोरे चा हीचा मारेकरी शेख अल्ताङ्ग शेख बाबु यास ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी, व हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यात यावा, वैष्णवी ची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, या मागण्या पोलीस प्रशासनाद्वारे सरकारकडे मांडण्यात आल्या. बंद दरम्यान नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करून आरोपीस कडक शासन मिळावे अशी मागणी केली. यावेळी गोंदी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सरपंच शैलेंद्र पवार,मा. सभापती तात्यासाहेब चिमणे, शिवसेनेचे मा. उपजिल्हाप्रमुख श्रीकृष्ण बोबडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, रोहयो अध्यक्ष अंकुश बोबडे, तात्यासाहेब चिमणे, बजरंग दलाचे राजेंद्र चिमणे,पं.स. सदस्य रमेश बोबडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे, सुधाकर घेर,भिमराव बोबडे,पत्रकार संघाचे रमेश बोबडे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष बोबडे,उपाध्यक्ष योगेश अग्रवाल,मा.पं.प. सदस्य सुदाम मापारे, काँग्रेसचे कल्याण चिमणे, संभाजी बिग्रेडचे सचिन चिमणे, नाभिक समाज संघटनेचे बाबासाहेब वाघमारे, परीट समाज संघटनेचे विष्णू वाघमारे, सावता परिषदेचे आनंद कडूकर, जनार्दन बारवकर, रमेश गाडेकर, सावता ग्रुप चे अध्यक्ष राजेंद्र वाजे, उपाध्यक्ष गणेश खेत्रे,रॉयल ग्रुपचे विकास साबळे,शरद वाजे, अशोक वाजे,सुधाकर वाजे,विठ्ठल कडुकर,बाळराजे वाजे आदी उपस्थित होते. बंददरम्यान शहागड चे सपोनि हनुमान वारे,तीर्थपुरी चौकीचे सपोनि गजानन कौळासे यांनी सहकार्यासह तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Leave a comment