कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील 43 गावची बाजार पेठ असलेल्या कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोडकळीस आलेल्या ईमारतीवर ता.5 जुलै रोजी शेवटी हातोडा पडला असूनजुन्या इमारतीच्या लाकडी खिडक्या दरवाजे काढण्याचे काम सुरू झाले. असून ही जुनी इमारत पाडण्यात येणार आहे. नवीन इमारतीचे काम सुरू होणार आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची गर्दी असते 40-43चाळीस-त्रिचाळीस गावांचा रोजचा रुग्णांचा संपर्क येतो परिसरातून रुग्णांची नेहमीच या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी असते येथील इमारत जुनी झाल्याने गावकर्यांनी नवीन इमारतीची मागणी केली होती .नवीन इमारतीस मंजुरी मिळाली असून जुन्या इमारतीतील सर्व साहित्य हलविण्यात आले असून जुन्या इमारतीच्या खिडक्या दरवाजे काढून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे .येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचार्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात व नवीन इमारतीची मागणी वेळोवेळी गावकरी व परिसरातील रूग्णानमधून केली होती.नवीन इमारतीचे काम लवकर सुरू करण्यात यावे , प्राथमीक आरोग्य केंद्राचे काम हे सर्वाच्या आरोग्याचा प्रश्न आहे . काम पुन्हा पुन्हा होत नाही प्राथमीक आरोग्य केंद्राचे काम दर्जेदारच झाले पाहिजे अशी गावकर्यांची अपेक्षा आहे.
Leave a comment