बदनापूर । वार्ताहर
जिल्हयातील मंठा येथील नवविवाहित तरुणीचा एका माथेङ्गिरुने भर बाजारात चाकूने सपासप वार करून हत्या केल्यानंतर तीव्र जनभावना झालेली असून त्या घटनेच्या निषेधार्थ व हा खटला ङ्गास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष वकिल नेमण्याच्या मागणीसाठी बदनापूर येथे सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी बदनापूर शहरातील व्यवावसायिकांनी स्वयंस्ङ्गुर्तीने बंद पाळल्यामुळे शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठ कडकडीत बंद होत्या.जालना जिल्हयातील मंठाा येथे 30 जून रोजी एका नवतरूण केवळ चार दिवसांपूर्वी विवाह झालेल्या मुलीचा भर बाजारात शेख अल्ताङ्ग शे. बाबू या नराधम तरुणाने तेिाील बाजारपेठेत चाकून सपासप वार करून निघृण हत्या केलेली होती.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. शेख अल्ताङ्ग हा तरुण या मुलीला मागील कित्येक दिवसांपासून त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून या मुलीचे शिक्षणही अर्धवट राहिलेले होते. अशा प्रवृत्तीला खीळ बसावी यासाठी हा खटला ङ्गास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून या खटल्यासाठी विशेष वकिलाची नेमणूक करावी यासाठी येथील सर्व पक्षाच्या वतीने व सर्व सामाजिक संघटनानी हिंदू एकता मंचातर्ङ्गे बदनापूर शहरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला बदनापूर येथील व्यापार्यांनी मोठा प्रतिसाद दिला. व्यापार्यांनी स्वयंस्ङ्गुर्तीने कडकडीत बंद पाळून आपआपली व्यावसिाकय प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. बदनापूर शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. यावेळी बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी या बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता.
Leave a comment