बदनापूर । वार्ताहर
तालुक्यात अतिवृष्टी होऊन रोषणगाव मंडळात मोठे नुकसान झालेले होते त्याच्या पाहणीनिमित्त राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे आले असताना त्यांनी नानेगाव येथील राजुरेश्वर विद्यालयत परीसरात त्यांनी वृक्षारोपण करण्यात आले. बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात मागील आठवडयात अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात हानी झालेली होती या दरम्यान शेतकर्यांना भरपाई मिळावी या उददेशाने मुख्यमंत्री उदध्व ठाकरे यांनी रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांना या भागाची पाहणी करण्यास पाठवलेले होते.
या पाहणी दौर्यात मंत्री संदीपान भुमरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नानेगाव येथील राजुरेश्वर ग्रामीण विकास सेवाभावीचे संस्थेचे राजुरेश्वर कनिष्ठ महाविद्यालयासही भेट दिली. यावेळी ग्रामीण भागात चांगल्याप्रकारे सुविधा देण्यात येत असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य् भिमराव डोंगरे यांनी शाळेची व ते देत असलेल्या शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. या शाळा परिसरातच ना. संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश् चव्हाण, गजानन गिते ,राधाकिसन चव्हाण काका आदींनी वृक्षारोपण करून शाळेच्या प्रगतीचीही पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरूण पाटील, छगन पवार, भरत नलवडे, बप्पासाहेब ढोले, सुनील चव्हाण, संतोष पठाडे, विलास देशमुख, सुभाष कांबळे, गिरीश डबकलवार, संतोष पेटोरे, श्रीराम खरोडे, एकनाथ कनके, पंजाब चव्हाण, शिवाजी डोंगरे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment