जालना । वार्ताहर
समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी लावलेली झाडे जगवली आणि त्या झाडांचा दरवर्षी वाढदिसव साजरा केला जाऊ लागला. परंतु त्यांची बदली झाल्याने यावर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कर्मचार्यांनी कायम ठेवली आहे. या वर्षी निवासी उप जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण विभागाचे प्रादेशीक उपायुक्त जे. एम. शेख यांच्या हस्ते झाडांचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. पुर्वी ज्या ठिकाणी झाडं लावली गेली त्याच ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण केले जात असल्याचा प्रकार सर्रासपणे पहायला मिळतो. परंतु जालना येथील समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी 2016 मधे लावलेली झाडे पुर्ण पणे जगवली. त्याची नियमीत काळजी घेत होते, उन्हाळी परिस्थीती असतांनाही त्यांनी झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या प्रयत्नांना पाहुन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांनी वर्गनी जमा करुन स्वतंत्र बोअरवेल खोदली. त्यामुळे झाडांना पाणी देण्याचा प्रश्न सुटला. लावलेली पुर्ण झाडे जगली. त्यामुळे पुन्हा झाडे कुठे लावायची हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय हे हिरव्यागार झाडांनी बहरले आहे.
जिथे मोकळी जागा तिथे झाडाची लागवड होते व ते झाड जगवलेली जाते. त्यामुळे यावर्षी वृक्ष लागवडीत या कार्यालयाला सहभागी होता येईल की नाही हे सांगता येत नाही. सुमारे 3 हजार झाडे या कर्मचार्यांनी जगवली आहेत. त्यांचा हा आदर्श इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नक्कीच घेण्यासारखा आहे. बलभीम शिंदे यांनी झाडं लावली, जगवली आणि त्यांचा प्रेमाणे वाढदिवस देखील साजरा केला. परंतु त्यांच्या बदली नंतर मात्र झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा खंडीत होईल असे वाटले होते. परंतु संतोष आढे यांनी पुढाकार घेत हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व कर्मचार्यांसमोर प्रस्ताव मांडला. त्यावर सर्वांनी सहमती देत हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यासाठी लागणारा केक इतर कुठूनही खरेदी न करता संतोष आढे या कर्मचार्यांनी घरीच केक बनवला होता. झाडांच्या चौथ्या वाढदिवसाचा केक निवासी जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते कापून सोशल डिस्टंसींगचे नियकम पाळून साजरा करण्यात आला तर समाज कल्याण विभागाचे प्रादेशीक उपायुक्त जे. एम. शेख यांच्या हस्ते मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करुन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दादाराव रगडे, दत्तात्र्यय वाघ, गणेश अंबुरे, सुरेंद्र चित्तेकर, संतोष आढे, अनिल सुनगत, देवानंद सानप, संदीप कांबळे, गजानन गवळी, नितीन दौड, हरीदास भोपळे, संदीप जाधव, अजय जारवाल, तुकाराम वाघ, काशिनाथ गनगे, भिम गायकवाड, मिठ्ठू चव्हाण, अतुल बडवे, मिलींद गाढे, शारदा काकडे, अशोक रगडे, रोषण गोणेकर, तातेराव लोखंडे यांची उपस्थिती होती.
Leave a comment