बदनापूर । वार्ताहर

एका दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या वाळू माङ्गिया असलेला आरोपीने इतरांसोबत संगनमत करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व इतरांच्या अंगावर स्कारपीओ गाडी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून एका आरोपीस ताब्यात घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करे व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर आरोपी ङ्गरार आहेत तर परमेश्‍वर शिवराम माताडे यास अटक करण्यात आली आहे सदर घटना 2 जुलै रोजी घडली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील संजय ओंकार उगले विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात तीन महिन्यापूर्वी गावातील एका व्यक्तीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत आहे मात्र तो मिळून आलेला नाही विशेष म्हणजे सदर आरोपी हा वाळू माङ्गिया असून काही राजकीय मंडळींचा हस्तक असल्याने बिनधास्तपणे वाळू व्यवसाय करीत आहे,ङ्गरार असलेला आरोपी संजय उगले हा गावात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने  सदरील गुन्ह्यात संजय ओंकार उगले यास अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे आपल्या इतर कर्मचार्‍यासोबत 2 जुलै रोजी 4 :30 वाजता कुंभारी येथे जात असतांना आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस येत असल्याचा सुगावा लागल्याने आरोपीने देवपिपंळगाव ते कुंभारी रस्त्यावर वाहन सोमो क्रमांक एम एच 04 एङ्ग ए 8143 हे वेगाने चालवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत व त्यांच्या सहकार्‍यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल   वाळू माङ्गिया असलेल्या संजय उगले या आरोपीने परमेश्‍वर शिवराम मताडे रा डोंगरगाव, नानासाहेब इंगळे रा कुंभारी व शुभम यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतरांच्या अंगावर वाहन टाकण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी स्वतःचा बचाव केला व आरोपीचा पाठलाग केला असता संजय उगले व इतरांनी पाल काढला तर परमेश्‍वर मताडे यास अव्हनसह पकडण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणी 2 जुलै रोजी रात्री उशिरा 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून ङ्गरार आरोपींचा शोध घेतला जात आहे,आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य,उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे करीत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.