जालना । वार्ताहर
मंठा तालुक्यातील नवविवाहीत तरुणी वैष्णवी गोरे हिचा अमानुषरित्या खुन करण्यार्या नराधम आरोपी शेख अलताङ्ग याला कडक शासन करून ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जालना शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे मंठा तालुक्यात घडलेल्या या हत्येचा जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. नवविवाहीत तरुणीचा निर्दयपणे भररस्तात खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने नवविवाहीतेच्या धारदार हत्याराने खून करुन माणुकीच्या नावाला कलंक लावलेला आहे.
आरोपीला कडक शासन होवून त्यास ङ्गाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्यांचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या कडे करण्यात आली आहे. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे, विशेष सरकारी वकीलाची या प्रकरणी नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष शेख मेहमूद यांनी केली आहे. या प्रकरणी काही राजकीय पक्ष या घटनेला जातीचे स्वरुप देत आहे, ही बाब अत्यंत निदनिय आहे. गुन्हे गाराला कुठलीच जात नसते गुन्हेगाराला पाठीशी घालने म्हणजे महापाप होय. असे शेख मेहमूद यांनी पत्रकात नमुद केले आहे. जिल्हाचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांनी या प्रकरणी विशेष पोलीस तपास अधिकारी नेमुन आरोपी विरोध दोषारोप पत्र लवकर दाखल करुन आरोपीला ङ्गासावर लटकविण्यासाठी कार्यवाई करावी व गोरे कुंटुंबियांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी कॉग्रेस शहरध्यक्ष शेख मेहमूद केली आहे.
Leave a comment