जालना । वार्ताहर
विद्युत उपकेंद्रात गोंधळ घालून वरिष्ठांविषयी अपशब्द वापरणार्या महावितरणच्या तंत्रज्ञास कार्यकारी अभियंता अर्शद खान पठाण यांनी गुरुवारी निलंबित केले. विष्णू अंकुश टाके हा महावितरणच्या परतूर शहर शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. 26 जून रोजी टाके याने रात्री 9 नंतर 33 केव्ही उपकेंद्रात कर्तव्यावर असलेले बाह्यस्रोत यंत्रचालक सय्यद नौशाद यांना ङ्गोनवरून लाईन परमिट का देत नाही म्हणत उपकेंद्रात येऊन गोंधळ घातला.
तसेच नौशाद यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या कृत्याची नौशाद यांनी व्हिडीओ क्लिप बनवताच टाके याने वरिष्ठांविषयी अपशब्द काढले. या प्रकरणाची दखल घेत जालना विभाग-2 चे कार्यकारी अभियंता अर्शदखान पठाण यांनी टाके यास 2 जुलै रोजी निलंबित केले आहे.
======
शिव चौंडीये यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन
परतूर । वार्ताहर
शहरातील जुना मोंढा भागात राहणारे शिवा रमेश चौंडीये (38) यांचे शुक्रवारी (दि.3) सकाळी 4.30 वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी कॉम्प्युटर टायपिंगच्या व्यवसायातून शहरातील अनेक ग्राहकांना आपलेसे केले होते.शिवा चौंडीये यांच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन भाऊ,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.
Leave a comment