जाङ्गराबाद । वार्ताहर
संपूर्ण देशात 24 मार्च पासून लॉकडाऊन लागू झाल्याने स्थलांतरित मजूर असंघटित कामगार बांधकाम मजूर शेतमजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मागील तीन महिने पासून उसनवारी करून आपला चरितार्थ हे सर्व चालवत आहेत परंतु परिस्थिती आज ङ्गार गंभीर झाली आहे उपासमारीची वेळ आली आहे.
सगळीकडे काम बंद पडल्याने कामगारांना कोणताही काम नाही जे गोरगरीब मजूर आहेत त्यांचे कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे करेल याकरिता केंद्र व राज्य सरकारने काहीतरी आर्थिक मदत म्हणून प्रत्येक मजुराला दहा हजार रुपये अनुदान दरमहा पुढील सहा महिने थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावे असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब, यांना दिले यावेळी जिल्हा सदस्य परवेज खान पठाण, तालुका अध्यक्ष अकील मिस्त्री, सचिव नब्बु शहा, शहर अध्यक्ष शेख अहमद, मुजाहिद पठाण, अजगर खान, इस्माईल भैया, शाहिद खान, पुंजाराम पिंपळ, सय्यद शकील, शब्बीर शेख, मोहसीन सय्यद इत्यादी यावेळी उपस्थित होते.
Leave a comment