मयत वैष्णवी गोरे यांच्या कुटुंबियांना लोणीकर यांची 51 हजार रुपयाची आर्थिक मदत
मंठा । वार्ताहर
झालेल्या थरारक हत्याकांडमध्ये वैष्णवी नारायण गोरे या नवविवाहित तरुणीचा दुखत मृत्यू झाला असून शेख अश्पाक शेख बाबू या नराधमाला ङ्गाशीची शिक्षा होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असून या नराधमाला अशी होण्यासाठी ङ्गास्टट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी व वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची सरकारने करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली. मंठा येथे दिवंगत वैष्णवी गोरे यांच्या घरी आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज सांत्वनपर भेट दिली यावेळी तालुका अध्यक्ष सतीश राव निर्वळ सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे शहराध्यक्ष कैलास बोराडे संचालक विठ्ठलराव काळे निवास देशमुख सुभाष राठोड मुस्तङ्गा पठाण परभणी येथील बाळासाहेब जाधव सुभाष आंबट डॉ उमेश देशमुख उद्धव नाईक राजेभाऊ खराब, गणेशराव चव्हाळ यांची उपस्थिती होती यावेळी 51 हजार रुपयांची रोख मदत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर सभापती संदीप गोरे उपसभापती राजेश मोरे यांच्या वतीने गोरे कुटुंबियांना करण्यात आली.
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून शेख अश्पाक शेख बाबू या नराधमाला जोपर्यंत अशी होत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाठपुरावा करणार आहे असेही यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले शासकीय योजनेमधून गोरे कुटुंबियांना घर देता येईल यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांनी मार्ङ्गत आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील प्रयत्न करणार आहे असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोणीकर यांच्या हस्ते पत्रकार पोलीस आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना कोविड किटचे वाटप
आपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून योद्धा म्हणून करुणा प्रादुर्भाव काळात काम करणार्या पोलीस आरोग्य कर्मचारी शिक्षकांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या आमदार निधीतून -19 किटचे वाटप करण्यात आले कोरोना प्रादुर्भाव काळात सर्वांनी खूप मेहनतीने व धैर्याने आलेल्या संकटाचा सामना केला असून समाजासाठी आपण सर्वांनी एक आदर्श निर्माण केला आहे अशी भावना यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केली राहुल लोणीकर शिक्षक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून उपस्थित सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि किटचे वाटप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
Leave a comment