शिवाजी विद्यालयातील निरोप सभारंभात उपस्थितांचे डोळे पाणावले !
जालना । वार्ताहर
सरकारी सेवेतील अधिकारी- कर्मचारी असो की शिक्षक ! प्रत्येकाला नियत वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागते ! परंतू शिक्षकाचे निवृत्त होणे हे अनेकांसाठी जड अंतकरणाने निरोप देतांना खटकणारे ठरते ! त्याचे कारणही तसेच आहे. शिक्षकाला गुरुचे स्थान प्राप्त झालेले आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी महाविद्यालयातील निसर्ग, विद्यार्थी आणि कलाप्रिय शिक्षक यशवंत गाठेकर हे देखील 30 जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
गाठेकर यांचे निवृत्त होणे स्वभाविक असले तरी ते अनेकांच्या मनाला पटणारे नाही. कारण गाठेकर हे जसे कलाप्रिय शिक्षक होते तसेच ते निसर्ग आणि विद्यार्थी प्रिय देखील म्हणूनच शाळेच्यावतीने त्यांना निरोप देतांना सहकारी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावणे सहज शक्य आहे. यशवंतराव गाठेकर गुरुजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाळेच्यावतीने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमास मुख्याध्यापक बी. डी. झोटे, पर्यवेक्षक बी. जी. डोळस, शिक्षक प्रतिनिधी विलास इंगळे, ज्येष्ठ शिक्षक एस. एम. काळे, एस. बी. जाधव, सुधाकर बोरडे, नंदकिशोर सोनटक्के, केशव रगडे, रमेश वायकोस, कृष्णा निकम, पंकज निकम, धोंडीराम निक्कम, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठीत नागरीक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निरोप समारंभात सामाजिक अंतर राखत श्री. गाठेकर यांचा शाल, श्रीङ्गळ आणि पुष्पहार देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सहकारी शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करतांना श्री. गाठेकर यांच्या कार्याचा गौरवपूर्व उल्लेख करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. गोपाल पठाडे यांनी तर आभार प्रा. शामसुंदर मिश्रा यांनी मानले.
तरीही शाळेला वेळ देऊ
यावेळी सत्काराला उत्तर देतांना यशवंतराव गाठेकर म्हणाले की, मी 32 वर्षाचा सेवाकाळ पूर्ण करुन आज आपण सेवानिवृत्त होत असलो तरी यापुढेही शाळेने कधीही आवाज दिला तर आपण त्यासाठी तत्पर राहूत! सेवाकालात जितकी सेवा करता आली ती प्रामाणिकपणे करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांनी कलेचा आदर केला तर या क्षेत्रातही मोठे भवितव्य असल्याचेही ते म्हणाले.
Leave a comment