पद्मावती नगर भागात वृक्ष लागवड शुभारंभ
जालना । वार्ताहर
बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा र्हास होत असून ग्लोबल वॉर्मिंगचे भयंकर संकट उभे राहिले आहे. भावी पिढ्यांना मोकळा श्वास घेता यावा,चांगले आरोग्य देण्यासाठी प्रत्येक घरासमोर केवळ वृक्ष लागवड करून च न थांबता कर्तव्य भावनेतून वृक्ष जतन मोहीम गतीमान करणार असल्याची माहिती नगरसेविका सौ.स्वातीताई सतीश जाधव यांनी दिली. चंदनझिरा परिसरातील पद्मावती नगर भागात शुक्रवारी (ता.03) वृक्ष लागवड व संवर्धन मोहिमेचा शुभारंभ स्वाती जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. लक्ष्मीबाई लहाने, राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा पुर्णिमा जाधव, आयोजक सौ. रेणुका विघ्ने, सौ.निलम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका सौ. स्वाती जाधव पुढे म्हणाल्या की, लॉकडाऊन मुळे तीन महिन्यांपासून कारखाने बंद असल्याने प्रदुषणास काही प्रमाणात आळा बसला. तरी ही वृक्ष संपदे बाबतीत परिस्थिती चिंताजनक आहे. असे सांगून स्वाती जाधव यांनी संपूर्ण प्रभाग हिरवागार करण्यासाठी कोरोना प्रमाणे व्यापक जनजागृती करून लोकचळवळ राबवली जाईल असे ही त्या म्हणाल्या. लॉकडाऊन च्या काळात प्रभागातील रोजगार गमावलेल्या महिलांना मास्क निर्मीती द्वारे उपलब्ध केलेला रोजगार , संपूर्ण परिसरात निर्जंतुकीकरण ङ्गवारणी, यासह नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेतली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आगामी संचारबंदी चे काटेकोर पालन करण्यासाठी सहकारी नगरसेविका सौ लक्ष्मीबाई लहाने व जागृक नागरिकांच्या मदतीने लॉकडाऊन यशस्वी करणार असल्याचा निर्धार ही स्वाती जाधव यांनी व्यक्त केला. नगरसेविका सौ लक्ष्मीबाई लहाने यांनी संचारबंदी कालावधीत बाहेर न पडता कोरोना ची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी सौ.सुभद्रा नन्नवरे, राजवीर जहाल, कविता कपाटे, संगीता भंडारे, निशा पाल,राजगुडे, यादव, गीता, अश्विनी, तृप्ती, यांच्या सह महिलांची उपस्थिती होती.
Leave a comment