लेहा । वार्ताहर
कर्जबाजारी शेतकर्याने घरातील लोखंडी खांबाला साडीच्या साह्याने गळङ्गास लावून आत्महत्या केल्याची घटना सेलूद येथे घडली आहे.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील सेलूद येथील रहिवाशी रामदास मोतीराम खराटे (वय 46) यांनी दि 30 आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने घरातील लोखंडी अँगलला लावून आत्महत्या केली असून त्यांच्याकडे ग्रामिण बँक पिपंळगाव रेणुकाई.1 लाख 23 हजार रूपये व एसबीआय बँक, वालसांवगी यांचे दिड लाख रुपये आहेत, यातच काही दिवसा पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंपळगाव रेणुकाई यांची काही दिवसा अगोदरच कर्ज वसुलीची नोटीस सुद्धा मिळालेले आहे.या सर्व विचाराने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे बोलल्या जात आहे, या प्रकरणी दुर्गादास खरोटे यांच्या ङ्गिर्यादी वरून पारध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Leave a comment