तळणी । वार्ताहर
मंठा तालुक्यातील तळणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तळणी परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते. या आंदोलनात शेतकर्यांना पीक कर्ज तात्काळ देण्यात यावे, उर्वरित शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, नेहमित्त कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्सहन निधी देण्यात यावा, लाखापर्यंत शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, शेतकर्यांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोयाबीन पेरणी करूनही सोयाबीन उगवली नाही त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांनी दुबार, तीबार पेरणी केल्यामुळे शेतकरी अर्थिक संकटात आला आहे.या शेतकर्यांना शासनाने मदत करावी.अशी मागणी धरणे आंदोलनात निवेदनाद्वारे करण्यात आली.या वेळी मंडळ अधिकारी घुगे साहेब व बँक व्यवस्थापक बुधवंत साहेब यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये गजानन देशमुख, दत्तराव कांगणे, गणेशराव कापकर, सरकटे,नितीन सरकटे, प्रल्हाद आपा सरकटे, नवनाथ खंदारे, केशव येऊल, किशोर हनवते, बाबाराव गुंड, विजय देशपांडे, भागवत देशमुख, जितेंद्र सरकटे, सुधाकर सरकटे, रामेश्वर सरकटे, रवी पाटील, मधुकर सरकटे, नामदेव खुळे, आबासाहेब सरकटे, सुभाष राठोड, सिद्धेश्वर सरकटे, शरद सरकटे, शशिकांत सरकटे व इतर कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a comment