कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
़घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव स्मशानभुमी मध्ये गेलेल्या दोन-चार दिवस झालेल्या पावसाचे पाणी साचले आहे. स्मशानभुमीतील पाणी बाहेर जाणारा रस्ता बंद केल्याने स्मशामभुमीत पाण्याचे डबके साचले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्मशानभुमीकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या नंतर तरी विसाव्याला जागा निट आसावी.या परिसरातील नागरिक स्मशानभुमीत घाण आणून टाकत आहेत. स्मशान भुमीला कोणी मालक नसल्याने जेला वाटेल तसे ते स्मशानभुमीचा वापर करत आहेत. पुर्वीच्या तहसिलदारांनी स्मशानभुमीची पाहणी करून होत असलेल्या अतिक्रमनाबाबत तलाठी यांना जमीनीचे क्षेत्रफळ किती त्याचा अहवाल देण्याचे सांगीतले होते. तत्कालीन तहसिलदारानी पाहणीही केली होती. सध्या मात्र स्माशान भुमीला तलावाचे स्वरूप आले असून परिसरात केरकचरा घाण टाकत असल्याने दुर्गंधीही सुटली आहे. येथून जाणारी पाणी पुरवठ्याची पाईपलाईनही लिकीज झाल्यास त्यातून घाण पाणी ही जाईल या स्मशानभूमीकडे लक्ष देण्याची मागणी दफनविधीसाठी आलेल्या नागरीकांमधून होत आहे.
Leave a comment