तिर्थपुरी । सर्जेराव गिरे

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकर्‍यांना तीन कोटी रुपयाच पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक एस आर ईरीचे दिली असून  शासनाच्या महा विकास आघाडी सरकारच्या महात्मा ङ्गुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपये पर्यंत शेतकर्‍यांना पीक कर्जाची माङ्गी दिलेल्या शेतकर्‍यांना तीर्थपुरीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अंतर्गत दहा गावातील 400 कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्‍यांना तीन कोटी रुपये शेतकर्‍यांच्या थेट सेव्हिंग खात्यामध्ये जमा केली आहे.

शासनाने शेतकर्‍यांच्या कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी असे अस्मानी-सुलतानी संकट शेतकर्‍यावर आल्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती काहीच येत नसल्यामुळे महा विकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना महात्मा ङ्गुले कर्जमुक्ती योजनेमध्ये दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाङ्गी देण्यात आली या अनुषंगाने तीर्थपुरीच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत एकूण दहा गावे येत असून या दहा गावातील एक हजाराहून शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये बसविण्यात आले पैकी शासनाने शेतकर्‍यांना खरीप हंगाम बी बियाणे औषधे खते पेरणीसाठी शेतकरी अडचणीत आहे त्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप व्हावी अशी आदेश येताच ग्रामीण बँकेने शेतकर्‍याची कर्ज मागणी 800 शेतकर्‍यांनी ऑनलाइन कर्ज मागणी केली यावर बँकेने कोणतीही अटी न घालता शेतकर्‍यांना 400 लाभार्थी खातेदारांना तीन कोटी रुपयाची पीक कर्जाची वाटप संबंधित शेतकर्‍याच्या सेव्हिंग खात्यात जमा केल्या मुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा पेरणीच्या तोंडावर मिळाला तसेच उर्वरित 400 लाभार्थी यांच्याही सेविंग खात्यात लवकरच रात्रंदिवस पीक कर्जाचे वाटप करण्यात येईल यासाठी बँकेचे उपव्यवस्थापक राजेसुलवार, पीडीमाचे बाळू काळे आदीसह बँकेचे कर्मचारी पीक कर्जाचे वाटपासाठी परिश्रम घेत आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामीण बँकेने प्रथम पीक कर्जाची वाटप केल्यामुळे शेतकर्‍यांना बी बियाणे खरेदी साठी मार्केटमध्ये तात्काळ खरेदी करून पेरणीसाठी लगबग सुरू केली असून यामुळे शेतकर्‍या आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.