जालना । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा अध्यक्ष व श्री.शिवाजी हायस्कूल जालना चे वरिष्ठ लिपिक विष्णू शिंदे हे आज दि. 30 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार माऊली निवास नरिमननगर येथे जालना जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने छोटेखानी करण्यात आला.असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शांताराम तौर,बाबासाहेब पाटील, कल्याण नरवडे ,महेंद्र सोरटी,अब्दुल हकीम कुरेशी, सुभाष कुचेकर, परमेश्वर लहाने यांची उपस्थिती होती.
Leave a comment