कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे कोरणा रुग्ण आढळला असून ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते.त्यांचा कुंभार पिंपळगाव येथे दवाखाना आहे. ते कुंभार पिंपळगावला अपडाऊन करत होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पण झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींना घनसावंगी येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्याॉब घेण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
मंगळवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर डॉ.दीपाली चव्हाण, सरपंच शहानाजबी पठाण, अन्वर पठाण, ग्रामसेवक विनोद भगत यांनी परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून हा परिसर संपूर्ण सील केला आहे या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्वेक्षण करत असून डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या कुं.पिंपळगाव सर्कल मधील 350 जनांना होम क्वारंटाईन आदेश देण्यात आले आहे. लोकांची यादीही करण्यात आली असून कोरोना संसर्ग झालेल्या डॉक्टरचा दवाखाना परिसर आझाद नगर , झोपडपट्टी भाग संपूर्ण सिल केला असून मंगळवारी घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून 203 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 952 लोकांनी तपासनीस करण्यात आली या मध्ये हायरिक्स 28 जन असल्याचे कुंभार पिंपळगाव आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली.
Leave a comment