लोणीकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी बिनवडे यांची ग्वाही
सोयाबीन बियाणे उगवले नाही अशा शेतकर्यांना मोफत बियाणे देणार
लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश, जिल्हाधिकार्यांनी संबंधितांना काढले आदेश
जालना । वार्ताहर
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन योजनेअंतर्गत मार्चपूर्वी प्रशासकीय मान्यता देऊन निधी खर्च करणे आवश्यक होते परंतु शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व जनसुविधा अंतर्गत कामांच्या प्रशासकीय मान्यता वर्षभर देण्यात आल्या नाहीत त्यासाठी शिखर परिषदेची बैठक गरजेची आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते परंतु मी पालकमंत्री असताना या सर्व प्रशासकीय मान्यता झालेल्या होत्या विनाकारण वेळ घालवला गेला यासाठी जबाबदार असणार्या सर्व लोकांवर कारवाई अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली होती त्यावरून लोणीकर व जिल्हाधिकारी बिनवडे यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता त्यावर आता पडदा पडला असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्यात समन्वय झाल्याचे चित्र आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिसून आले यावेळी पालकमंत्री राजेश टोपे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित होते.
रूर्बन योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही लोणीकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रूर्बन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सोळा गावांचा एकत्रित विकासासाठी ही योजना आखण्यात आली आहे यामध्ये असणार्या शेतकर्यांच्या एमआयडीसीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यामध्ये सोयाबीन टोमॅटो बटाटे इत्यादींवर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग शेतकर्यांसाठी उभारले जात आहेत त्या सर्व कामांना प्रशासनाचा प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून ही सर्व कामे अडखळली होती परंतु आता मात्र लोणीकर आणि जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एकत्रित बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावले जातील अशी जिल्हाधिकार्यांनी दिली व व कामात गय करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा शब्द लोणीकर यांना दिला त्यानुसार मागील आठवडाभरात सोळा कोटी रुपयाच्या मान्यता जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.
रूर्बन योजनेसाठी केंद्र सरकारकडून मिळालेला 21 कोटी रु निधी पैकी 9 कोटी रुपये मार्च अखेर खर्च करणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही प्रशासनाच्यावतीने त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न यावेळी झाला त्यामुळे आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून मिळणारे 21 कोटी रुपये ते देखील मिळाले नाहीत खर्च न झालेले असे रूर्बन योजनेचे एकंदरीत 42 कोटी रुपयाचे नुकसान प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले असे लोणीकर यांनी खडसावल्यानंतर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन वर्षापासून अंगणवाडी शाळा खोली बांधकाम कंपाउंड वॉल चे बांधकाम एमआयडीसी इत्यादीचा निधी खर्च न करणार्या शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली यापुढे गुणवत्तापूर्ण कामे न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोणीकर यांनी बियाणे महामंडळाच्या विभागीय अधिकार्यांना धरले धारेवर
बियाणे महामंडळाचे विभागीय कार्यालय यासाठी बबनराव लोणीकर पालकमंत्री असताना त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली व सोबतच प्रोसेसिंग प्लांट साठी सुद्धा निधी उपलब्ध करुन देण्यात आला अशा एकूण 50 कोटी रुपये खर्च करून विभागीय कार्यालय जालन्यात उभे राहिले मात्र या उद्देशाने बियाणे महामंडळाचे विभागीय कार्यालय जालन्यात आणले तो उद्देश साध्य न होता बियाणे महामंडळाच्या अधिकार्यांनी त्यांच्या कार्यालयाला दलालीचे केंद्र बनवून ठेवले आहे अशा कठोर शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी बियाणे महामंडळाच्या विभागीय अधिकार्यांना धारेवर धरले. जालना जिल्ह्यामध्ये एकूण सातशे क्विंटल बियाणे शेतकर्यांना देण्यात आले असून ज्यांचा बियाणं उगवलं नाही त्यांना तात्काळ उद्यापासूनच मोफत बियाणं दिले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिंदे यांची देखील उपस्थिती होती. बियाणे महामंडळ ही सरकारची ची आणि जनतेची विश्वासार्हता असणारी संस्था असून अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकर्यांची माती झाली आहे अशा शब्दात बबनराव लोणीकर यांनी अधिकार्यांची कानउघडणी केली सरकार जर जनतेला आणि शेतकर्यांना फसवणार असेल तर त्यांनी दाद मागायची कुणाकडे असा सवाल देखील यावेळी लोणीकर यांनी उपस्थित केला.
Leave a comment