मंठा । वार्ताहर
मंठा तालुक्यातील आंबोडा कदम येथे ढगफुटी झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अगोदरच शेतकर्यांचा कापूस घरामध्ये आहेत शासनाने कापूस खरेदी न केल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड हाल झाले आहे. त्यात बोगस बियाणे मिळाल्यामुळे अनेक शेतकर्यांची सोयाबीन उगवले नाही आणि आणि यात कहर म्हणजे ढगफुटी झाली आणि आंबोडा कदम परिसरातील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून जिल्हाधिकार्यांनी अहवाल तात्काळ शासनाकडे पाठवावा अशी सूचना देखील यावेळी लोणीकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना केली.
तात्काळ पाहणी करून शासनाला अहवाल पाठवू- जिल्हाधिकारी
मंठा तालुक्यातील आंबोडा कदम येथे झालेल्या ढगफुटीची तात्काळ पाहणी करून व पंचनामे करून शासनाला तात्काळ अहवाल पाठव अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी दिली.
Leave a comment