ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना घरात रहा सुरक्षित राहाण्याचे आवाहण...
कुंभार पिंपळगाव -वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मोठे बाजार पेठेचे ग्रामीण शहर म्हणून ओळखले जाणारे कुंभार पिंपळगाव येथे काल दि.28 रोजी कोरोणा पाँझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होताच
गावात भिती दायक वातावरण निर्माण झाले असून पाँझिटिव्ह आलेले एक प्रसिद्ध डॉक्टरच असल्याने त्यांच्या संपर्गात आलेल्या लोकांनात चर्चा ऐकावयास येत असून त्यांच्या कडे सेवेत असलेल्या कर्मचऱ्यास कोरणटाईन करण्यात आले असून ते डॉक्टर औरंगाबाद येथे उपचार घेत असल्याचे सूत्रा कडून माहिती प्राप्त झाली असून याबाबत
खबरदारी उपाय म्हणून व्यापारी , पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतच्या वतीने ... अत्यआवश्यक सेवा वगळता ता.२९ सोमवार पासुन सात दिवस बाजार पेठ कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ..
Leave a comment