जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे. आज रविवारी (दि.28) सकाळी आणखी 46 बाधित रुग्णांची भर पडल्याने जालना जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. दरम्यान आजपर्यंत बाधितांपैकी एकुण 317 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्जार्च देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
शनिवारी 110 संशयीत व्यक्तींच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी केवळ 22 अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. त्यात चार पॉझिटिव्ह आणि 18 निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.तसेच आणखी 38 नवीन संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जालना शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी जालना नगर परिषद कार्यालायतील एका कर्मचार्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्यासह आठ ते दहा कर्मचार्यांच्या लाळेचे नमुने घेऊन ते जिल्हा रुग्णालयाने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. आज रविवारी सकाळी 42 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत त्यात जालना नगर परिषद कार्यालयातील एका अधिकार्यांसह एका वाहन चालकाचा आणि शहरातील दोन खाजगी डॉक्टरांचा समावेश आहे.
Leave a comment