परतूर । वार्ताहर
राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या ङ्गंडातील सुरक्षा किटचे वाटप जि.प चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेउपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते परतूर पोलिस ठाणे,ग्रामीण रूग्णालय,परतूर येथे वाटप करण्यात आले. यावेळी राहुल लोणीकर म्हणाले की,कोरोना संकटांच्या काळात आरोग्य कर्मचारी डॉक्टर,पोलिस बांधव,स्वच्छता कर्मचारी,कोविड योध्दे यांचे मोठे योगदान असुन परतूर विधानसभा मतदार संघात कोरोनाला यशस्वीरित्या पायबंद घालण्यास वरील यंञणामुळेच यश मिळाले असुन ,आपण आ.बबनराव लोणीकर यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलतांना राहुल लोणीकर म्हणाले की; लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मतदार संघातील गोरगरीब जनतेला धान्य वाटप करण्यात आले.त्याच बरोबर सॅनिटायझर,साबन, जिवनावश्यक वस्तुचे वितरण करण्या बरोबरच पुणे,मुंबई,नाशिक,औरंगाबाद,गोवा येथील मतदार संघातील बांधवांना दोन महिने पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले असेही ते म्हणाले. संकटाच्या काळात जे स्वतः रणांगणात कोरोनाचा सामना करून सर्वसामान्याचे जीव वाचवण्याचे काम रात्रंदिवस करीत आहेत त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या स्वेच्छा निधीमधून सुरक्षा किट उपलब्ध करून दिल्या असून मतदारसंघातील कोविड-19 संदर्भात काम करणार्या कर्मचार्यांना या कीट देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले यावेळी तालुका अध्यक्ष रमेश भापकर उपविभागीय पोलिस अधिकारी सोपान बांगर, पोलीस निरीक्षक शिरीश हुंबे, डॉ. ज्ञानदेव नवल नगरसेवक संदीप बाहेकर ,सुधाकर सातोनकर, दिगंबर मुजमुले ,कृष्णा आरगडे ,संपत टकले ,सुरेश सोळंके ,संतोष हिवाळे, विशाल कदम, सोनू अग्रवाल, ज्ञानेश्वर जईद, प्रवीण सातोनकर, शत्रुघ्न कणसे, कल्याण बागल, सोपान धुमाळ , राम सोळंके, विष्णू ढवळे ,विष्णू कदम, सरङ्गराज कायमखानी, के.जी राठोड, प्रमोद राठोड पोलीस कर्मचारी व डॉक्टर आरोग्य कर्मचारी शिक्षक बंधू यांची उपस्थिती होती.
Leave a comment