शेतकर्यांच्या प्रश्नावर माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर आक्रमक
जालना । वार्ताहर
सर्वसामान्य शेतकर्यांनी घरगुती बियाणे वापरून सोयाबीनची पेरणी केली ते ज्ञान उगवलं परंतु महाराष्ट्र सरकारने इंदोर आणि कर्नूल या ठिकाणावरून खरेदी केलेलं महामंडळाचे मात्र 70 टक्के जर्मिनेशन असतानादेखील उगवलं नाही यावरून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला जाब विचारला असून बियाणं महामंडळाला महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांचे रक्त शोषण करणारी संस्था करून ठेवला आहे बियाणे महामंडळ म्हणजे शेतकर्यांची दलाली करणारे केंद्र बनला आहे अशा शब्दात बबनराव लोणीकर यांनी शासन आणि प्रशासनाला जाब विचारला आहे 70 टक्के जर्मिनेशन असतानादेखील महाराष्ट्र सरकारने दिलेले बियाणं उगवत नसेल तर शेतकर्यांनी विश्वास कोणावर ठेवावा असा सवाल करत शेतकर्यांची ङ्गसवणूक करणार्या बियाणे महामंडळावर आणि आणि इंदोर आणि कर्नूल येथील ज्या कंपन्याकडून बियाणे खरेदी केले त्यात कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली.
शेतकर्यांच्या प्रश्नावर लोणीकर प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी निर्माण झाले शेतकर्यांनी पेरणी कधी व कशी करावी कोणत्या पिकासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण पोषक आहे कोणती ङ्गवारणी केली पाहिजे कोणते खत दिले पाहिजे या सर्व बाबीसाठी शासनस्तरावर प्रचंड पैसा खर्च केला जात आहे. परंतु सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत त्याची कोणतीही माहिती पोहोचवली जात नाही याबाबत अधिकार्यांशी ङ्गोनवरून चर्चा करून बियाणे महामंडळाने शेतकर्यांची माती केली अशा शब्दात लोणीकर यांनी जालना औरंगाबाद बीड व अहमदनगर या चार जिल्ह्याचे काम बघणार्या अधिकार्यांना खडसावले 70 टक्के जर्मिनेशन असताना बाहेरच्या राज्यातून खरेदी केलेले बियाणे प्रमाणित केलेले असताना सोयाबीन किंवा कापूस यासारखे बियाणे उगवत नाही ही अत्यंत गंभीर बाब असून त्यासाठी सर्वस्वी बियाणे महामंडळ जबाबदार आहे असे लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले शेतकर्यांमध्ये प्रचार-प्रसार केला असतात किंवा कोणते बियाणे कधी पेरणी करायची याबाबत जागरूकता निर्माण केले असते तर शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवून असतं आणि शेतकर्यांची माती झाली नसते अशा कठोर शब्दात लोणीकर यांनी बियाणे महामंडळाचे अधिकारी नोविद यांना खडसावले बियाणे महामंडळ ही सरकारची संस्था असून बियाणे महामंडळाने जर शेतकर्यांचा विश्वासघात केला तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण होतो खंडपीठाने देखील सोयाबीन न उगवल याची गंभीर दखल घेतली असून शेतकर्यांच्या तक्रारी नोंदवून घेत गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांना आदेश दिले आहेत अशी माहिती यावेळी लोणीकर यांनी दिली बियाणे उगवले नाही याबाबत बियाणे निरीक्षक आकडे तक्रारी करून देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही बियाणे निरीक्षकाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले असून बोगस बियाणे उत्पादित करणार्या कंपन्या त्यांची पुरवठादार व दोषी असणारे बियाणे महामंडळाचे अधिकारी यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी लोणीकर यांनी यावेळी केली जिल्हा व तालुका कृषी अधिकारी आणि बियाणे निरीक्षक यांनी किती शेतकर्यांना बियाणे न उघडल्यामुळे ङ्गटका बसला आहे व त्यांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती खंडपीठाने मागवली असून तात्काळ खंडपीठाला सदरील माहिती ती द्यावी अशी सूचना देखील यावेळी लोणीकर यांनी संबंधित अधिकार्यांना केली औरंगाबाद विभागातील जालना औरंगाबाद बीड व अहमदनगर या चार जिल्ह्यात 27 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे विक्री झाले असून परभणी विभागांमध्ये परभणी नांदेड हिंगोली लातूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 52 हजार क्विंटल बियाण्याची विक्री झाल्याची माहिती यावेळी लोणीकर यांनी दिली ज्या शेतकर्यांचे बियाणे उगवले नाही त्या सर्व शेतकर्यांनी आपल्या शेतात बियाणे न उगवल्या बाबतचा पंचनामा करून रीतसर पोलिसात तक्रार दाखल करावी आपली तक्रार महाबीज बियाणे महामंडळाचे एमडी अनिल भंडारी (मोबाईल क्रमांक 7588609600) अजय कुचे मार्केटिंग अधिकारी (मोबाईल क्रमांक 7588609643) औरंगाबाद विभाग महाबिज विभागीय अधिकारी आर एम नवोद (मोबाईल क्रमांक 7588608079) महाबीज चे परभणी विभागीय अधिकारी अरुण सोनवणे (मोबाईल क्रमांक 7588608500) क्वालिटी कंट्रोल प्रयोग शाळेचे व्यवस्थापक श्री लहाने (मोबाईल क्रमांक 7588609614) या नंबर वर संपर्क करून आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
येणार्या अधिवेशनात शेतकर्यांशी बेईमानी करणार्यांवर हक्कभंग आणू-लोणीकर
70 टक्के उगवणक्षमता असल्याची चाचणी झालेली असताना देखील सोयाबीन उगवतं असेल तर त्यासाठी पूर्णतः बियाणे महामंडळ जबाबदार आहे बियाणे महामंडळाच्या अधिकार्यांनी प्रचार-प्रसार केला नाही सरकारने आणि बियाणे महामंडळाच्या अधिकार्यांनी बियाणे महामंडळाला शेतकर्यांचं रक्त शोषण करणारी संस्था आणि दलाली खाण्याचा आता बनवून ठेवला आहे हे ङ्गार दिवस चालणार नाही येणार्या अधिवेशनात शेतकर्यांशी हरामखोरी करणार्यांना चांगला धडा शिकवू अशा शब्दात लोणीकर यांनी बियाणे महामंडळाच्या अधिकार्यांना खडसावले. येणार्या अधिवेशनात बियाणे महामंडळाचे एम डी, मार्केटिंग मॅनेजर, सर्व विभागीय अधिकारी यांच्या विरोधात लक्षवेधी सूचना मांडल्या जातील, तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल, यासह या सर्व अधिकार्यांवर हक्कभंगाची कारवाई करण्याबाबत भाजपचे सर्व आमदार विधानसभेत व विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र ङ्गडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आवाज उठवतील अशा शब्दात लोणीकर यांनी खडसावले.
Leave a comment