घनसावंगी । वार्ताहर
घनसावंगी विधान सभा मतदार संघाचे राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघात घनसावंगी येथील महाराट्र बँक चे अधिकारी मनमानी करत असून शाशनाच्या छञपति शिवाजी महाराज या योजने अंतर्गत दिड लाख रु पर्यत योजनेचे शेतकर्याच्या खात्या जमा झालेल्या शेतकर्याला बँक प्रशासन कागद पञाची पुर्तता च्या तारीख ला शेतकर्यानी सर्व कागद पञे बँक व्यावस्थापक यांच्या कडे सादर केले या सर्व कागदपञे साठी शेतकर्याला सात ते आठ हजाररुपये खर्च आला तर काही शेतकर्याकडे दुसर्या बँकेचे कर्ज होते त्यामुळे महाराट्र बँकेचे कर्ज मिळणार म्हणून त्यांनी दुसर्या बँकेच्या कर्जाची परत ङ्गेड केले व काही शेतकर्यानी खाजगी सावकाराकडुन कर्ज घेवुन बँकेचे कर्ज ङ्गेडले परंतु अद्याप हि या शेतकर्याना कर्ज तर मिळालेच नाही पण हे अधीकारी तारीख पे तारीख देत आहेत जर एखादा शेतकरी जास्त बोलला तर आमच्या हातात काही नाही तुम्ही औरंगाबाद ला जाऊन पहा असे सांगन वेळकाडुपणा करत आहे अगोदरच शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असतांना त्याला नाहक ञास देण्याचाप्रकार सुरु आहेत या अनागोंदी कारभारा कडे पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी लक्ष देतील का असे शेतकरी वर्गातून ऐकावयास मिळत आहे.
Leave a comment