तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील शेतकर्याच्या पिक कर्ज व इतर समस्या बाबत घनसावंगी तहसील कार्यालय येथे भाजपच्या वतीने निवेदन देऊन विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या यामध्ये तालुक्यातील सर्व बँकांची एकत्रित बैठक बोलावून शेतकर्यांना लवकरात लवकर पिक कर्ज देण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी तालुक्यातील बोगस बियाणेमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी शेतकर्यांना व शेती पिकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी शेतकर्यांना संरक्षण मिळण्यासाठी बंदिस्त तार कंपाउंड वॉलसाठी 90 टक्के सबसिडी देण्यात यावी शेतकर्यांना मागेल ते खत बियाणे तात्काळ उपलब्ध करून देण्यात द्यावी तालुक्यातील घरात राहिलेला शेतकर्याचा कापूस तात्काळ खरेदी करण्यात यावा तालुक्यातील 2019 चे अतिरिक्त पावसाचा अनुदान काही गावांना संपूर्ण अनुदान बाकी आहे आणि काही गावात ङ्गळबाग अनुदान बाकी आहे निधी उपलब्ध करून ते तात्काळ वाटप करावे पंतप्रधान सन्मान निधी योजनेतील वंचित शेतकर्यांना लवकर लाभ देण्यात यावा कोराणामध्ये जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे अशी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे घनसावंगी तालुका आध्यक्ष शिवाजी बोबडे देवनाथजी जाधव अंकुशराव बोबडे संजय तौर अशोक राजे जाधव योगेश देशमुख विष्णू जाधव तात्यासाहेब चिमणे प्रताप कंटुले जुगल किशोर चांडक भरत परदेशी अण्णा बोबडे शेषनारायण मापारे लक्ष्मण खंडागळे भरत उगले सुभाष देवडे संभाजी घोगरे आदींची उपस्थीती होती.
Leave a comment