बदनापूर व अंबड येथील अतिवृष्टी झालेल्या शेतांची बांधावर जाऊन पाहणी
बदनापूर । वार्ताहर
अंबड व बदनापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची ङ्गलोत्पादन व रोहयो मंत्री मा. संदीपान भुमरे यांनी पाहणी केली असता या भागात प्रचंड नुकसान झालेले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून येणार्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या भागातील शेतकर्यांना तात्काळ भरपाई देण्यासाठी मुददा मांडणार असल्याचे प्रतिपादन करून या शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वसन दिले. 24 जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी करण्याकरिता रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी शनिवारी सकाळपासून अंबड तालुक्यातील हरतखेडा व बठाण खुर्द तसेच बदनापूर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव, रोषणगाव, मांजरगाव, कस्तुरवाडी, वाकुळणी या गावाचा नुकसान पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे, आ. नारायण कुचे, भानुदास घुगे, भगवान कदम, अशोक पाटील बरडे, जयप्रकाश चव्हाण, गजानन गिते, बी टी शिंदे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, बाबासाहेब इंगळे, दिनेश काकडे, नंदकिशोर दाभाडे, आदींची उपस्थिती होती.
बदनापूर तालुक्यात गुरुवारी रात्री ढगङ्गुटी सदृश पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान केलेले होते. शेतकर्यांच्या पेरलेल्या जमिनी मातीसह वाहून गेल्या तर काही ठिकाणी ङ्गळबागा असलेली झाडे दोन दोन ङ्गुट पाणी वाहल्यामुळे झाडे मुळासगट उपटून वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्यांचे राहते घर पडण्याच्या घटना घडल्या तर बैल, ढोरे वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. या भागातील जुने केटीवेअर, बंधारे ङ्गुटून ते पाणी शेतकर्यांच्या पेर झालेल्या शेतात गेल्यामुळे शेतीच्या शेती वाहून गेले तर शेती कामासाठी लागणारे अवजारेही वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या भागातील शेततळे भरून ङ्गुटले तर विहिरीत माती वाहून गाळ साचून बुजल्या गेलेल्या आहेत. या ढगङ्गुटी सदृश पावसाने या भागातील शेतकर्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र आहे. अतिवृष्टी झाल्यावर लगेचच माजी आमदार संतोष सांबरे यांनी मा जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या सोबत बाधित गावांचा दौरा केला व संपूर्ण माहिती व अहवाल मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवला, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेऊन कॅबिनेट मंत्री मा संदीपान भुमरे यांना अतिवृष्टी मुळे प्रभावित गावांचा दौरा करण्याचे सांगितले, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या कडून माहिती घेऊन मा संदीपान भुमरे यांनी अंबड तालुक्यातील हरतखेडा व बठाण येथील दुधना नदीला आलेल्या पुरा मुळे नुकसान झालेल्या शेतीची बांधावर जाऊन पाहणी केली तसेच बदनापूर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव, वाकुळणी परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती,आणि बंधार्याची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकर्यांशी चर्चा केली. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बाबत पाहणी करण्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांना पाठवले होते.
शेतकर्यांच्या झालेल्या प्रचंड हानी बाबत माहिती देऊन शेतकर्यांना दुबार पेरणी करण्याची गरज असल्यामुळे तात्काळ भरपाई मिळवून देण्याची मागणी केली असता मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्यांच्या शेतीची, ङ्गळबागांसोबत इतर मालमत्तेचीही प्रचंड हानी झालेली असल्यामुळे ही बाब तात्काळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडून पंचनामे करण्यात येतील व जास्तीत जास्त मदत शेतकर्यांना मिळवून देण्यात येईल असे सांगितले. त्याचप्रमाणे येणार्या मंत्रीमंडळ बैठकीत या बाबत मुददा उपस्थित करून या शेतकर्यांना तात्काळ मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री संदीपान भुमरे यांनी यावेळी सांगितले. बदनापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी झाल्याबरोबर जिल्हाअधिकारी बिनवडे यांना तात्काळ झालेल्या नुकसान पाहणी करुन पंचनामा करण्याची मागणी केली व मा.मुख्यमंत्री यांना माहीती कळवून बदनापूर तालुक्यातील झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानी बाबत चर्चा करुन सर्व माहीती दिल्या नंतर त्यांनी मा.राज्यमंत्री संदिपान भुमरे यांना पाहणी दौरा करुन लवकरात लवकर शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली. यावेळी सिद्धेश्वर उबाळे, कुमार रुपवते, रवी बोचरे, नामदेव खंडेकर, गजानन सानप, रावसाहेब पवार, हरिभाऊ कापसे, प्रसाद चव्हाण, संभाजी अवघड, बळीराम बचाटे, आप्पासाहेब शेरे, ज्ञानेश्वर जर्हाड, भागवत जर्हाड, सीताराम वीर, गोविंद वीर, विठ्ठल वीर, रावसाहेब शेळके, पंढरीनाथ वीर, मोहसीन पठाण, राजू वीर, गणेश मुळे, अमोल सोनवणे, श्रीधर वीर, परशराम कोल्हे, परमेश्वर म्हस्के, सोमनाथ म्हस्के, सुदर्शन भाले, आदीनाथ वीर, विष्णु वीर, सुदाम वीर, शामराव चव्हाण, दीपक देशमुख, वल्लभराव चव्हाण, प्रमोद चव्हाण, उदयराव चव्हाण, राजू चव्हाण, गणेश चव्हाण, सुदाम काळे, राहुल पांडे, जिजा काळे, कल्याण काळे, नामदेव काळे, राजेंद्र चौधरी, दत्ता चव्हाण, लक्षमन चव्हाण, अरुण काळे, शरद अवघड, जनार्दन अवघड, खंडु काळवणे, विनायक कोळकर, तुकाराम अवघड, बबन बोरुडे, विठ्ठल कोळकर, संदीप अवघड, परमेश्वर अवघड, गणेश पांगरे, सलीम तांबोळी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment